डिजिटल इंडिया की तंत्रज्ञानाचं कलियुग? या आहेत 5 धोकादायक Technology, मानवतेलाही टाकतील हादरवून
भारतासह जगभरातील तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे. ज्या कामांसाठी पूर्वी दिवसेंदिवस लागत होते, तीच काम आता काही मिनिटांत केली जातात. शिक्षण असो किंवा बिझनेस तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात केला जातो. तंत्रज्ञानाची प्रगती माणसांसाठी फायद्याची ठरत आहे, पण या फायद्यांसोबतच तंत्रज्ञानामुळे धोके देखील वाढले आहेत. गुन्हेगार तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून लोकांची माहिती लिक करत आहेत. शिवाय लोकांकडून पैसे देखील उकळत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान शाप की वरदान, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. आता आम्ही तुम्हाला अशा पाच धोकादायक तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहोत, जे भविष्यात मानवतेसाठी धोका निर्माण करू शकतात.
चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत. पण या फायद्यांसोबतच याचा गैरवापर देखील केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, चीनमध्ये मुस्लिम समुदायावर लक्ष ठेवण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी या चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. रशियासारख्या देशांमध्येही रस्त्यांवर बसवलेले कॅमेरे “खास लोकांची ओळख पटवण्यासाठी वापरले जातात. हे तंत्रज्ञान आपली बायोमेट्रिक माहिती जसे की चेहरा, बोटांचे ठसे आणि हावभाव गोळा करते. पण जर या माहितीचा गैरवापर केला गेला तर आपल्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
आधी मनोरंजन आणि फोटोग्राफीसाठी ड्रोनचा वापर केला जात होता. मात्र आता युद्धक्षेत्रात स्मार्ट ड्रोनचा वापर केला जातो, जो स्वत:च निर्णय घेऊन निशाणा लावतो. जरी हे ड्रोन लष्करी कारवायांमध्ये गती आणि कार्यक्षमता आणतात, परंतु जर तांत्रिक बिघाड झाला तर ते निष्पाप लोकांना देखील लक्ष्य करू शकतात. युद्धावेळी या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने देशांमधील शत्रुत्व आणखी वाढू शकते.
AI च्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या आवाजाची नक्कल करू शकता. फक्त काही सेकंदांचा आवाज किंवा काही प्रतिमा घेऊन, तुम्ही AI च्या मदतीने क्लोनिंग आणि डीपफेक व्हिडीओ तयार करू शकता. हे व्हिडीओ अगदी वास्तविक असल्यासारखे वाटतात. डीपफेक तंत्रज्ञान मशीन लर्निंग आणि फेस मॅपिंग वापरून व्हिडिओ तयार करते ज्यामध्ये एखादी व्यक्ती अशा गोष्टी सांगत असल्याचे दिसते जे त्याने कधीही सांगितले नव्हते. अनेक कलाकार, नेतेमंडळी, अभिनेते, यांचे डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ डिलीट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात.
GROVER सारख्या AI सिस्टीम फक्त एक हेडलाइन वाचून पूर्णपणे बनावट बातम्या तयार करू शकतात. OpenAI सारख्या संस्थांनी आधीच असे बॉट्स तयार केले आहेत जे खऱ्या वाटणाऱ्या बातम्या तयार करू शकतात. मात्र या बॉट्सचा गैरवापर होऊ नये, म्हणून तो अद्याप सार्वजनिक करण्यात आला नाही. कारण जर हा बॉट्स कोणत्या चुकीच्या व्यक्तिच्या हातात पडला तर लोकशाही आणि सामाजिक स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात.
स्मार्ट डस्ट म्हणजे माइक्रोइलेक्ट्रोमॅकेनिकल सिस्टम्स (MEMS). स्मार्ट डस्ट इतकी छोटी असते की त्याचे कण मिठाएवढे असतात. यामध्ये सेंसर आणि कॅमेरे लावलेले असतात, जे सर्व डेटा रेकॉर्ड करतो. आरोग्य आणि सुरक्षितता यासारख्या क्षेत्रात त्याचा वापर अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. पण पाळत ठेवणे, हेरगिरी करणे किंवा बेकायदेशीर कामांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मोठी संकट निर्माण होऊ शकतात.