Samsung Galaxy S26 Ultra ची वाढली क्रेझ, लाँचपूर्वीच लीक झाले Features! डिझाईनमध्ये बदल होण्याची शक्यता
स्मार्टफोनची चर्चा सुरु झाली आणि त्यामध्ये सॅमसंगचं नाव नाही, असं होणं शक्यच नाही. कारण जगभरातील टॉप टेक कंपन्यांमध्ये सॅमसंगचा देखील समावेश होतो. बजेट स्मार्टफोनपासून प्रिमियम डिव्हाईसपर्यंत, सॅमसंग त्यांच्या प्रत्येक ग्राहकांसाठी त्यांच्या बजेटनुसार स्मार्टफोन लाँच करत असते. दरवर्षी सॅमसंग त्यांच्या Galaxy S सीरीजच्या नव्या फ्लॅगशिप डिव्हाईससह टेक वर्ल्डमध्ये धमाका करत असतो.
2025 मध्ये कंपनीने त्यांची गॅलेक्सी S25 अल्ट्रा ही प्रिमियम स्मार्टफोन सिरीज लाँच केली होती. यानंतर आता सर्वांच्या नजरा सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन सिरीजकडे आहेत. कंपनी लवकरच त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Samsung Galaxy S26 Ultra लाँच करणार आहे. लीक्स आणि रिपोर्ट्सद्वारे अशी माहिती मिळाली आहे की, या फोनमध्ये डिझाईन, कॅमेरा आणि बॅटरीच्या बाबतीत मोठे बदल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी कंपनी कॅमेरा डिझाइनमध्ये मोठा बदल करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे तो मागील सर्व मॉडेल्सपेक्षा वेगळा असेल. आगामी स्मार्टफोनमध्ये कोणते बदल केले जाऊ शकतात, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर कंपनीने जुन्या पद्धतीचे पालन केले तर गॅलेक्सी S26 अल्ट्रा जानेवारी 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत लाँच केला जाऊ शकतो. भारतात याची किंमत 16GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 1,59,999 रुपये असू शकते. तर अमेरिकेत याची किंमत $1,299 आणि दुबईमध्ये ही किंमत AED 4,699 असू शकते.
गॅलेक्सी S26 अल्ट्रामध्ये मागील मॉडेल प्रमाणेच कलर पॅलेट दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. सॅमसंग आता त्यांच्या फ्लोटिंग कॅमेरा डिजाइनऐवजी कॅमेरा आयलंडमध्ये किमान तीन सेन्सर बसवण्याची योजना आहे.
हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Elite 2 प्रोसेसरवर आधारित असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला जाण्याची शक्यता आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच OLED पॅनल दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. पॉवरसाठी, यात 5500mAh बॅटरी आणि 60W फास्ट चार्जिंग दिले जाईल.
गॅलेक्सी S26 अल्ट्रा चा कॅमेरा या सिरीजमधील सर्वात मोठे हायलाईट असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 200MP Sony प्राइमरी सेंसर, 50MP पेरिस्कोप टेलीफोटो, 50MP अल्ट्रा-वाइड एंगल, 12MP टेलीफोटो सेंसर यांचा समावेश असणार आहे. हे तुम्हाला वेगवेगळ्या लाइटिंग कंडीशनमध्ये उत्तम फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यास अनुमती देईल.