प्रेमप्रकरणातून बाउन्सरची हत्या
वरोरा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच आता भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वृद्धाची हत्या करण्यात आली. शेगाव येथील आष्टा बायपास रोडवर नालेसफाईचे काम सुरू असताना दोन कामगारांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या वृद्धावर दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली.
विश्वनाथ परसराम कांबळी (वय ६५, रा. शेगवा) असे मृतकाचे नाव असून, महेंद्र रमेश भुरे (वय ३६ रा. दहेगाव जि. नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अवघ्या एका तासात अटक करण्यात आली असून, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र याने विश्वनाथ यांच्या डोक्यावर दगडाने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र, नागरिकांनी पाठलाग केल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच शेगाव पोलीस यांनी तातडीने कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीस अटक केली.
दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी चिमूर येथील फॉरेन्सिक पथक व चंद्रपूरची एलसीबी घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करत आहेत.
ठेकेदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आरोपी शेगाव येथे नालेसफाईचे काम करत होता. विशेष म्हणजे हा नालेसफाईचा ठेका माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या निकटवर्तीय ठेकेदाराला देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संबंधित ठेकेदाराकडे कामगारांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे समोर आले असून चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ठेकेदाराच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
RPI च्या कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या
आरपीआय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या अध्यक्षाची दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी (१३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास मोशी टोलनाका परिसरातील युवराज गार्डन हॉटेलमध्ये घडली आहे. जुन्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य सूत्रधार म्हणून नितीन धोत्रे याचे नाव समोर आले आहे.
पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; धक्कादायक कारणही आलं समोर






