फ्रीमध्ये मिळत आहेत 300 डायमंड्स आणि रेयर Emote, Free Fire MAX साठी हे आहेत आजचे रिडीम कोड्स
फ्री फायर मॅक्स हा भारतातील पॉपुलर बॅटल रॉयल गेम आहे. हा गेम भारतातील हजारो मोबाईल गेमर्स खेळतात. यामध्ये प्लेअर्सना आकर्षित करण्यासाठी ग्राफिक्स आणि गेमप्ले देण्यात आला आहे. याशिवाय या गेमची एक विशेष गोष्ट म्हणजेच या गेममधील ईव्हेंट्स. फ्री फायर प्लेअर्ससाठी या ईव्हेंटमध्ये अनेक आकर्षक गिफ्ट्स असतात. याशिवाय हा गेम प्लेअर्सना आकर्षित करण्यामागील दुसरं कारण म्हणजेच रिडीम कोड्स.
मृत्युनंतर तुमच्या सोशल मीडिया आणि डिजिटल डेटाचं नक्की काय होतं? जाणून घ्या सविस्तर
गेम डेवलपर कंपनी गरेना त्यांच्या प्लेअर्ससाठी रोज रिडीम कोड्स जारी करत असते. या कोडद्वारे, प्लेयर्स वेपन्स, कॅरेक्टर, बंडल आणि हिरे यासारख्या खास इन-गेम वस्तूंचा दावा करू शकतात, ते देखील अगदी मोफत. इतरवेळी या वस्तू खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना त्यांच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. मात्र रिडीम कोड्समुळे कोणतेही डायमंड खर्च न करता या सर्व वस्तू मोफत मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Garena Free Fire MAX गेममध्ये कोणत्याही प्रकारचे इन-गेम आइटम्स खरेदी करण्यासाठी इन-गेम करेंसी Diamonds ची गरज असते. डायमंड्स खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना पैसे खर्च करावे लागतात. काही प्लेयर्सना बिना पैसे खर्च करता या वस्तू मिळवायच्या असतात. अशाच प्लेअर्ससाठी गेम डेवलपर कंपनी गरेनाद्वारे रिडीम कोड्स रिलीज केले जातात. हे कोड्स 12 ते16 डिजिटचे असतात. यामध्ये नंबर आणि अल्फाबेट्स दोन्हींचा समावेश असतो. तथापि, हे सर्व कोड मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत, म्हणून तुम्हाला ते वेळेत रिडीम करावे लागतील. 1 जून 2025 साठी आज जारी झालेल्या रिडीम कोडची यादी पाहूया.
जून महिन्यासाठी फ्री फायर मॅक्समध्ये नवीन फायरबॉर्न कॉन्करर बूयाह पास रिलीज झाला आहे. या पासद्वारे, तुम्हाला गेममधील इतर अनेक रिवॉर्ड्ससह एक्सक्लुझिव्ह फियरलेस जनरल बंडल मेल आणि फिमेलचा अॅक्सेस मिळणार आहे. तथापि, गेममध्ये बूयाह पास खरेदी करण्यासाठी खेळाडूंना त्यांचे डायमंड्स वापरावे लागतात. गेममधील बूयाह पास प्रीमियमची किंमत 199 डायमंड्स आहे आणि बूयाह पास प्रीमियम प्लसची किंमत 699 डायमंड्स आहे. लेटेस्ट इवेंटद्वारे तुम्हाला हे पास खूप स्वस्तात मिळू शकतात.
फायरबॉर्न कॉन्करर बूयाह पास रिंग इव्हेंट फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह आहे. या इवेंटद्वारे तुम्हाला बूयाह पास प्रीमियम प्लस मिळवण्याची संधी मिळत आहे. हा इवेंट आज म्हणजेच 1 जून रोजी लाईव्ह झाला आहे, जो महिनाभर लाईव्ह राहील. या इवेंटमध्ये, बक्षीस म्हणून बूयाह पास प्रीमियम प्लस आणि टोकन मिळविण्याची संधी आहे. तुम्ही हे टोकन बदलून देखील पासचा दावा करू शकता. बक्षिसे मिळविण्यासाठी तुम्हाला स्पिन करावे लागेल. स्पिनसाठी तुम्हाला तुमचे इन-गेम चलन डायमंड्स वापरावे लागेल.