मृत्युनंतर तुमच्या सोशल मीडिया आणि डिजिटल डेटाचं नक्की काय होतं? जाणून घ्या सविस्तर
माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या नावावर असणारी सर्व संपत्ती आणि जमीनिची वाटणी केली जाते. ही वाटणी माणसाने लिहीलेल्या मृत्यूपत्रानुसार होते किंवा त्यांनी आधीच सांगितलेल्या त्याच्या इच्छेनुसार. संपत्ती आणि जमिनीची वाटणी तर केली, पण डिजीटल जगात असणाऱ्या ऑनलाईन डेटाचं काय? संपत्ती एवढाच सोशल मीडिया आणि डिजीटल मीडिया डेटा देखील महत्त्वाचा आहे. सोशल मीडिया आणि डिजीटल मीडिया डेटाला डिजिटल सपंत्ती म्हटलं जातं. पण व्यक्तीच्या मृत्यूनंतर या डिजिटल संपत्तीचं काय होतं, याबद्दल अनेकांना माहिती नसते.
डिजिटल संपत्ती दोन भागांमध्ये विभागली जाऊ शकते. ज्यामध्ये डिजिटल मालमत्ता आणि डिजिटल उपस्थिती यांचा समावेश आहे. वेबसाइट डोमेन, ऑनलाइन बिजनेस, क्रिप्टोकरेंसी, डिजिटल फाइल आणि मोनेटाइज्ड सोशल मीडिया अकाउंट्स यांचा डिजीटल संपत्तीमध्ये समावेश होतो. ही सर्व डिजिटल संपत्ती पासवर्डने सुरक्षित केलेली असते. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिजिटल उपस्थितीमध्ये सोशल मीडिया प्रोफाइल्स, फोटो, व्हिडीओ, ईमेल्स, चॅट्स आणि क्लाउडमध्ये सेव्ह करण्यात आलेल्या सर्व आठवणींचा समावेश होतो. या गोष्टींना भावनात्मक महत्व असते. सध्या डिजिटल उपस्थितीमध्ये आरोग्य अॅप्समधून काढलेला डेटा, तुमची लोकेशन हिस्ट्री, सर्च पॅटर्न आणि अगदी एआय द्वारे तयार केलेले व्हर्च्युअल अवतार यासारख्या अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. ज्या प्रकारे आपण आपल्या संपत्तीची वाटणी करतो, त्याच पद्धतीने आपण डिजीटल संपत्तीच्या वाटणीची प्लॅनिंग करणं देखील गरेजचं आहे. जर असं केलं नाही तर तुमच्या आठवणी तुमच्या प्रिय व्यक्तिंपर्यंत कधीच पोहोचणार नाहीत.
जर तुम्ही डिजीटल संपत्तीचं वाटप कशा प्रकारे करायचं आहे, याबाबत निर्णय घेतला नाही तर तुमच्या प्रियजनांना तुमच्या अकाउंट्स आणि डेटापर्यंत पोहोचणं खूप कठिण होणार आहे. कधीकधी कंपन्यांच्या अटी आणि शर्ती असतात ज्या फक्त अकाउंट
धारकालाच उपलब्ध असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर, डेटा काढण्यासाठी किंवा प्रोफाइल हटविण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रासारखी कागदपत्रे आवश्यक असतात. जेव्हा अशी योजना अस्तित्वात नसते, तेव्हा कुटुंबांना जुन्या कागदपत्रांमध्ये पासवर्ड शोधणे, रिकवरी टूल्सचा वापर करावा लागतो.