फोटो सौजन्य - Social Media
याशिवाय क्विक शेअर फीचर आणखी स्मार्ट झाले आहे. फोटोमधील चेहऱ्यांची ओळख करून तो फोटो कोणाला पाठवावा, याची सिस्टम स्वतः सूचनाही देते. नवीन क्रॉस-डिव्हाइस फीचर्समुळे फाइल शेअरिंग आणि कनेक्टिव्हिटीचा अनुभव अधिक सुलभ झाला आहे. ऑडिओ ब्रॉडकास्ट फीचर आता ऑराकास्ट आणि LE ऑडिओ सपोर्ट असलेल्या डिव्हाइसेसशी अधिक सहज कनेक्ट होते. फक्त मीडिया ऑडिओ नव्हे, तर फोन मायक्रोफोनचा आवाज देखील शेअर करता येतो. ग्रुप ट्रिप्स, मीटिंग्स किंवा कार्यक्रमांसाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.
स्टोरेज शेअरमुळे गॅलेक्सी इकोसिस्टम अधिक एकसंध झाली आहे. मोबाइल, टॅबलेट किंवा पीसीवरील फाइल्स आता थेट My Files अॅपमधून पाहता येतात. तसेच फोनवरील फाइल्स टीव्हीसह इतर सॅमसंग डिव्हाइसेसवरून ऍक्सेस करण्याची सोयही उपलब्ध आहे. वन UI 8.5 मध्ये सुरक्षा फीचर्स अधिक कडक करण्यात आले आहेत. थेफ्ट प्रोटेक्शन फोन हरवल्यावर किंवा चोरीला गेल्यावरही डेटा सुरक्षित ठेवतो. फेल्ड ऑथेंटिकेशन लॉक अनेक चुकीच्या प्रयत्नांनंतर डिव्हाइसला आपोआप लॉक करते, ज्यामुळे अनधिकृत प्रवेशाचा धोका कमी होतो.
याशिवाय, सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सेटिंग्ज आयडेंटिटी चेकद्वारे संरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वापरकर्ते स्वतःच्या डिव्हाइसवरील सुरक्षा नियंत्रण अधिक प्रभावीपणे सांभाळू शकतात. One UI 8.5 बीटा प्रोग्राम 8 डिसेंबरपासून भारत, जर्मनी, कोरिया, पोलंड, यूके आणि अमेरिका येथे उपलब्ध होणार आहे. हा अपडेट सर्वप्रथम गॅलेक्सी S25 सिरीज वापरकर्त्यांसाठी रोलआउट केला जाईल. बीटा व्हर्जन वापरण्यास इच्छुक वापरकर्ते Samsung Members अॅपद्वारे नोंदणी करू शकतात.






