iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय
Apple सतत त्यांच्या नवीन प्रोडक्ट्सवर काम करत आहे. यासोबतच कंपनी अॅप स्टोअरला सुरक्षित ठेवण्यासाठी देखील सतत प्रयत्न करत आहे. आयफोन युजर्सची सुरक्षा टिकून राहावी आणि अॅप स्टोअरवर कोणतेही चुकीचे अॅप्स उपलब्ध नसावे, यासाठी कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. युजर्सच्या सुरक्षेसाठी कंपनीने अलीकडेच दोन डेटिंग अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अॅप्स स्टोअरवरून Tea आणि TeaOnHer हे दोन्ही डेटिंग अॅप्स हटवले आहेत. आता हे दोन्ही अॅप्स जगभरातील आयफोन युजर्ससाठी बॅन केले जाणार आहेत. कंपनीने ही कारवाई युजर्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी लक्षात घेऊन केली आहे.
Tea आणि TeaOnHer अॅप्स विशेषत: त्यांच्या Anonymous Feedback Feature साठी ओळखले जातात. म्हणजेच युजर्स त्यांच्या डेट पार्टनरसाठी नाव न घेता रिव्ह्यु देऊ शकता. सुरुवातीला हे फीचर अत्यंत लोकप्रिय होतं, मात्र कालांतराने हे फीचर ट्रॉलिंग आणि प्राइवेसी वॉयलेशनचा मार्ग बनला आहे. त्यामुळे युजर्सच्या तक्रारी वाढत गेल्या. फीडबॅक पोस्टमध्ये कधीकधी अल्पवयीन मुलांबद्दल माहिती समाविष्ट होती, जी यूएस बाल संरक्षण कायदे आणि अॅपलच्या अॅप स्टोअर मार्गदर्शक तत्त्वांचे गंभीर उल्लंघन आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple त्यांच्या अॅप स्टोअरबाबत नेहमी कठोर भुमिका घेत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अॅप्सनी कंपनीच्या अनेक नियमांचे उल्लंघण केले आहे. TechCrunch ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, Apple ने सांगितलं आहे की दोन्ही अॅप्सनी अॅप स्टोअरच्या पॉलिसीच्या सेक्शन 1.4.3, 5.1.1 आणि 5.6 चे उल्लंघन केले आहे, ज्यामुळे या अॅप्सवर कारवाई करत हे अॅप्स आता अॅप स्टोअरवरून हटविण्यात आले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Tea आणि TeaOnHer हे दोन्ही अॅप्स सध्या गुगल प्ले स्टोअरवर अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहेत. हे स्पष्ट आहे की अॅपलने ही कारवाई त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांच्या संरक्षणाचा विचार करून केली आहे, कोणत्याही सरकारी आदेशानुसार नाही.
या अॅप्सच्या डेवलपर्स ने Apple ने घेतलेल्या या निर्णयावर नाराजी वर्तवली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, त्यांनी सर्व Apple सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आणि सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण केल्या. तरीही, दोन्ही अॅप्स कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय काढून टाकण्यात आले. डेव्हलपर्सनी सांगितले आहे की ते अॅप्स पुनर्संचयित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी कंपनीशी संपर्क साधतील.
Apple कंपनी कोणत्या देशाची आहे?
Apple Inc. ही अमेरिकन कंपनी आहे, तिचं मुख्यालय क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया (USA) येथे आहे.
iPhone कोण बनवते?
iPhone हा Apple Inc. द्वारे डिझाइन आणि विकसित केला जातो, पण त्याचे उत्पादन मुख्यतः चीन आणि भारतातील कारखान्यांमध्ये (Foxconn, Pegatron इ.) केले जाते.
iPhone आणि Android फोनमध्ये काय फरक आहे?
iPhone मध्ये iOS ऑपरेटिंग सिस्टम असते, तर Android फोनमध्ये Android OS वापरला जातो. iPhone मध्ये सिक्युरिटी, प्रायव्हसी आणि परफॉर्मन्स अधिक चांगले असतात.
iPhone ची बॅटरी इतर स्मार्टफोन्सपेक्षा कमी का टिकते?
iPhone मध्ये कॉम्पॅक्ट बॅटरी असली तरी ती iOS सॉफ्टवेअरशी जास्त ऑप्टिमाइज केलेली असते, त्यामुळे रिअल वर्ल्ड वापरात परफॉर्मन्स स्थिर राहतो.






