भारतात TV पेक्षा जास्त Reels ला पसंती, सर्वेमध्ये Meta ने केला दावा; जाणून घ्या सविस्तर
भारतात इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. क्रिएटर्स आणि इंफ्लुएंसर्स इंस्टाग्राममधील रिल्सच्या मदतीने लोकांचे मनोरंजन देखील करतात आणि पैसे देखील कमावतात. अलीकडेच मेटाद्वारे एक अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, भारतात TV पेक्षा जास्त Reels ला पसंती दिली जाते.
मेटाने गुरुवारी सांगितलं आहे की, इंस्टाग्राम रिल्स भारतात लीडिंग शॉर्ट-वीडियो प्लेटफॉर्म आहे. मेनलो पार्क बेस्ड सोशल मीडिया दिग्गजने दावा केला आहे की, भारतात याद्वारे करण्यात आलेला एक सर्वे या उत्तरांवर बेस्ड आहे. देशात रील्स लाँच झाल्याच्या पाच वर्षांनिमित्ताने एक सर्वे करण्यात आला आहे. या अहवालात कंपनीने असं सांगितलं आहे की, भारतातील युजर्स इतर प्लॅटफॉर्मपेक्षा रील्सला जास्त पसंती देत आहेत. तसेच, आता टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मपेक्षा शॉर्ट व्हिडिओ पाहण्याची वारंवारता जास्त झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, रिल्स प्लॅटफॉर्मबाबत अधिक दावे केले जात आहेत. मेटाने सांगितलं आहे की, हे निकाल इप्सोस नावाच्या मार्केट रिसर्च आणि पब्लिक ओपिनियन फर्मसोबत केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहेत. इंस्टाग्रामवर रील्स टॅब लाँच झाल्याच्या पाच वर्षांच्या निमित्ताने हे सर्वेक्षण करण्यात आले. कंपनीने सांगितलं आहे की, त्यांनी भारतातील 33 वेगवेगळ्या सेंटर्सद्वारे 3,500 हून अधिक लोकांकडून सर्वे करण्यात आला आहे. यामध्ये 92 टक्के पार्टिसिपेंट्सने असं सांगितलं आहे की, हे शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ पाहण्यासाठी रिल्सला अधिक पसंती दिली जात आहे. तथापि, सर्वेक्षणात कोणत्या प्रतिस्पर्ध्यांचा समावेश होता हे कंपनीने उघड केले नाही.
याशिवाय मेटाने असा दावा केला जात आहे की, 97 टक्के पार्टिसिपेंट्स कमीत कमी दिवसातून एक वेळा शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ पाहत आहेत. तुलनात्मकदृष्ट्या, 83 टक्के लोकांनी सांगितले की ते दररोज टीव्ही पाहतात. रिपोर्टमध्ये एप्रिल 2025 च्या ‘ऑनलाइन डिजिटल कंजप्शन ऑफ डिजिटल मीडिया’ स्टडी चा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये असं सांगितलं जात आहे की, 82 टक्के लोकं रोज सोशल मीडियाचा वापर करत आहेत. तर टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी हा आकडा अनुक्रमे 78 आणि 43 टक्के आहे.
क्रिएटर्सवर लक्ष देताना मेटाने सांगितलं आहे की, इंस्टाग्राम रिल्स कोणत्याही दुसऱ्या शॉर्ट-वीडियो प्लेटफॉर्मच्या तुलनेत 33 टक्के अधिक एंगेजमेंट पहायला मिळत आहे. इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत जास्त प्रेक्षक असलेल्या काही विषयांमध्ये ‘फॅशन/ट्रेंड आणि स्टाईल’ यांचा समावेश आहे ज्यांचा वापर 40 टक्के जास्त आहे. याचप्रमाणेच ‘ब्यूटी आणि मेकअप’ चा वापर 20 टक्क्यांहून अधिक आहे, ‘म्यूजिक/मूवीज’ चा वापर 16 टक्क्यांहून अधिक आहे. मेटाने म्हटले आहे की, ब्रँड शोधण्यात रीलची भूमिका महत्त्वाची आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 80 टक्के लोकांनी सांगितले की ते मेटा प्लॅटफॉर्मवर नवीन ब्रँड शोधतात.