Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील 'या' 5 सेटिंग्स
जर तुम्हि डिव्हाईसवर डेटा सेव्ह करण्यासाठी क्लाऊट सर्विसचा वापर करत असाल तर ऑटो-सिंक सेटिंग बंद करणं एक चांगला पर्याय ठरणार आहे. तुम्ही जर स्मार्टफोनमध्ये हि सेटिंग चालू ठेवली असेलतर फोनमध्ये सतत इंटरनेट आणि प्रोसेसर रिसोर्सचा वापर केला जातो. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये दिवसातून अनेक वेळा बॅकअप घेतले जात असेल स्मार्टफोनची बॅटरी कमी होण्याचा हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. ऑटो सिंक दिवसातून केवळ एक वेळा सेट करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या बहूतेक डिव्हाईस ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि एज लाइटिंग सारखे फीचर्स ऑफर करतात, हे फीचर्स फोनमध्ये सतत चालू असतील तर यामुळे बॅटरी लवकर संपू शकते. सेटिगमध्ये जाऊन तुम्ही हे फीचर्स बंद करून डिव्हाईसची बॅटरी लाईफ अधिक चांगली ठेऊ शकता.
सध्या अनेक डिव्हाईसमध्ये लोकेशन एक्यूरेसी मोड देखील असतो, जो जीपीएससह वाय – वाय आणि मोबाईल नेटवर्कचा वापर करते आणि याच्या मदतीने अचूक लोकेशन दाखवते. जर तुम्हाला केवळ बेसिक लोकेशनबाबत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन हा मोड बंद करू शकता.
बरेच लोक अजूनही बॅटरी वाचवण्यासाठी फोनचे व्हायब्रेशन बंद करतात, परंतु कीबोर्डचे आवाज आणि सिस्टमचे आवाज देखील प्रोसेसर वारंवार सक्रिय करतात. जर तुम्हाला स्मार्टफोनची बॅटरी वाचवायची असेल तर साउंड इफेक्ट आणि टच साउंड देखील बंद करावा लागणार आहे.
याशिवाय जर तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप पाहिजे असेल तर बॅकग्राऊंड अॅप्स रिफ्रेश सेटिंगमधून कंट्रोल करावं लागणार आहे. तुम्ही येथून काही अॅप्स डीप स्लीपमध्ये देखील ठेवू शकता, ज्यामुळे बॅटरी लाइफ आणि रॅम व्यवस्थापन दोन्ही सुधारेल.






