आता Gmail वरील ईमेल्स मराठीतही ट्रांसलेट करता येणार, आजच 'ही' सेटिंग करा
गुगलचे नाव जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या जगाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी गुगलचा क्रोम ब्राउझर वापरलाच असेल. Google आपल्या लाखो युजर्सना केवळ Chromeच नाही तर YouTube, Gmail, Translation, Google Meet, Google Maps सारखे अनेक ॲप्स देखील पुरवते, जे दैनंदिन दिनचर्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. गुगल आपल्या युजर्सना असे अनेक फीचर्स देखील प्रदान करते ज्यामुळे अनेक कठीण कामे सुलभ होतात. असेच एक महत्त्वपूर्ण फिचर म्हणजे ई-मेल ट्रान्सलेशन (E-mail Translation). या फीचरचा वापर करून युजर्स इंग्लिश ई-मेल्स मराठीत अथवा त्यांच्या आवडीच्या भाषेत ट्रांसलेट करू शकतात.
वास्तविक, Google त्याच्या Gmail ॲपमध्ये अनेक उत्कृष्ट फिचर प्रदान करते ज्यामुळे आम्ही आमचे काम सहज करू शकतो. मात्र जीमेलमध्ये उपलब्ध असलेल्या विशेष सुविधांची माहिती बहुतांश लोकांना नसते. Gmail मधील असेच एक फिचर म्हणजे इन ॲप लँग्वेज ट्रांसेलट. यामध्ये तुम्ही कोणताही ईमेल तुम्हाला ज्या भाषेत वाचायचा आहे त्या भाषेत ट्रांसलेट करू शकता.
Paytm Tips: QR कोडला होम स्क्रीनवर कसे ॲड करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
हे युजर्स घेऊ शकतात फीचरचा लाभ
Gmail च्या ॲप-मधील भाषा भाषांतर फीचरचा वापर करून, तुम्ही कोणत्याही मेलला तुमच्या भाषेत सहजपणे ट्रांसलेट करू शकता. गुगलने हे फीचर अँड्रॉइड, आयओएस आणि वेब या तिन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे फीचर गुगलने काही काळापूर्वी आणले आहे. याआधी हे फिचर फक्त जीमेल वेब यूजर्स वापरू शकत होते. या फीचरच्या मदतीने तुम्ही मिळालेल्या मेलचे सुमारे 100 वेगवेगळ्या भाषांमध्ये काही सेकंदात भाषांतर करू शकता.
Gmail App वर इंग्लिश मेलला मराठीत कसे ट्रांसलेट करावे?
सावधान! या धोकादायक ॲप्स डाउनलोड करताच तुमचे बँक अकाउंट होईल रिकामे, FBI ने जारी केला अलर्ट
जर तुम्ही Google मध्ये Gmail अकाउंट वापरत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की Gmail मध्ये येणारे ईमेल तुम्ही इतर भाषांमध्ये सहजपणे ट्रांसलेट करू शकता. यासाठी गुगलने आपल्या यूजर्ससाठी जीमेलमध्ये इन-ॲप ट्रांसलेट फीचर उपलब्ध करून दिले आहे. हे फीचर अँड्रॉइड, वेब आणि आयओएस या तिन्ही युजर्सना वापरता येईल.