कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार
कानाच्या समस्या कशामुळे उद्भवतात?
कानाच्या आजाराची लक्षणे?
कानातून सतत आवाज का येतो?
कान शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. कानाने केवळ ऐकण्याव्यतिरिक्त शरीराला अनेक फायदे होतात. लहान व्यक्त मुलांचे कान टोचले जातात. कान टोचल्यामुळे केवळ सौंदर्यायात वाढ नाहीतर मेंदूचा विकास होतो, ताणतणाव कमी होतो, पचनक्रिया सुधारते आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो इत्यादी अनेक फायदे होतात. पण काहीवेळा चुकीच्या सवयींमध्ये कानासंबंधित समस्या उद्भवू लागतात. कानात पाणी जाणे किंवा वारंवार कानात बड्स घातल्यामुळे आतील नाजूक पडद्याला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. कानात वेदना होणे, तर काहीवेळा कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो. बाहेरील कोणताही आवाज नसतानाही मेंदू चुकीचे ध्वनी संकेत अनुभवतो, ज्यामुळे कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो.(फोटो सौजन्य – istock)
अनेकांना सतत हेडफोन वापरण्याची सवय असते. तर मोठ्या आवाजाचा सतत संपर्क, सायनस, कानातील मळ किंवा श्रवणदोष इत्यादी अनेक कारणांमुळे कानांच्या वेदना वाढतात. याशिवाय उच्च रक्तदाब किंवा जबड्याच्या समस्यांमुळे कानातून आवाज येऊ लागतात. कानातून आवाज येण्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कारण ही लक्षणे हियरिंग डॅमेज किंवा सायन्सच्या समस्येमुळे सुद्धा उद्भवतात. आज आम्ही तुम्हाला टीनीटसची समस्या कशामुळे उद्भवते? टीनीटसची लक्षणे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.
Health Tips: रोज मूठभर खा गूळ-चना; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
डॉक्टरांच्या मते, टिनिटसवर उपचार करताना मूळ कारण शोधणे फार महत्वाचे आहे. रात्री झोपताना पंख्याचा आवाज किंवा हलके संगीत लावल्यास कानाच्या समस्येकडे दुर्लक्ष होते आणि वारंवार कान दुखण्याचे संकेत मिळत नाहीत. स्वतः कानात काहीही टाकू नये. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच उपचार करावेत. उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात कमीत कमी मिठाचे सेवन करावे. मानसिक ताणामुळे टिनिटसची तीव्रता अधिक वाढते, त्यामुळे नियमित योगासने करावीत.
Ans: मोठ्या आवाजाचा सतत संपर्क, वाढते वय, कानातील मळ, कानाचा संसर्ग, काही औषधांचे दुष्परिणाम, उच्च रक्तदाब किंवा इतर आरोग्यविषयक समस्या यामुळे टिनिटस होऊ शकतो.
Ans: होय. कारणानुसार औषधे, हिअरिंग एड, साउंड थेरपी, टिनिटस रिट्रेनिंग थेरपी (TRT) आणि जीवनशैलीतील बदल यांचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.
Ans: अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित ENT तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधे घेणे टाळा आणि मोठ्या आवाजापासून कानांचे संरक्षण करा.






