पुणे रेल्वे स्थानक (फोटो- टीम नवराष्ट्र )
याशिवाय, एखादी व्यक्ती हरवल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिचे छायाचित्र प्रणालीमध्ये अपलोड केल्यास ती व्यक्ती कॅमेऱ्यांच्या नजरेस पडताच आरपीएफला तत्काळ सूचना मिळेल.त्यामुळे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे अधिक सुलभ होणार आहे.या प्रणालीमध्ये आणखी आधुनिक सॉफ्टवेअर जोडण्याचे काम सुरू आहे,असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.स्थानकावरील पादचारी पुलावर किंवा इतर ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास ही प्रणाली धोक्याचा इशारा देणार असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनाला तातडीने उपाययोजना करता येणार आहेत.
जुने ७५ कॅमेरे टप्प्याटप्प्याने हटविणार
सध्या पुणे रेल्वे स्थानकावर एकूण २३५ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.त्यामध्ये नव्याने बसविण्यात आलेले १६० आणि जुने ७५ कॅमेरे आहेत.जुने कॅमेरे वारंवार बिघाड होत असल्याने आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च होत असल्याने पुढील सहा महिन्यांत ते टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार आहेत.
तीन अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर कार्यरत
प्रवाशांच्या सामानाची प्रभावी तपासणी करण्यासाठी स्थानकावर तीन अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर मशीन बसविण्यात आली आहेत.या स्कॅनरमध्ये वरच्या आणि खालच्या बाजूने तपासणी करणारी प्रणाली असल्याने संशयास्पद अथवा धोकादायक वस्तूंचा शोध अधिक अचूकपणे घेता येणार आहे.
ठळक मुद्दे
– पुणे रेल्वे स्थानकावर १६० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
– १९ कॅमेरे उच्च दर्जाच्या ४ के रिझोल्यूशनचे
– गुन्हेगार कॅमेऱ्यांच्या कक्षेत येताच आरपीएफला स्वयंचलित अलर्ट
– हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर
– पुढील सहा महिन्यांत जुने ७५ कॅमेरे हटविणार
– स्थानकावर तीन अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर मशीन कार्यरत
पिंपरी-चिंचवडच्या ‘स्मार्ट’ सुरक्षेचा बोजवारा, 500 सीसीटीव्ही कॅमेरे गायब; शेकडो बंद
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नवीन अत्याधुनिक १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.यामुळे कोणती अनुचित घटना घडत असेल किंवा धोकादायक स्थिती निर्माण झाली तर हे कॅमेरे संबंधित यंत्रणेला अलर्ट करतील.
हेमंम कुमार बेहरा,
जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे पुणे






