iphone (Photo Credit - X)
भारतात अॅपलची क्रेझ तुफान आहे. जेव्हा नवीन iPhone लाँच होतो, तेव्हा लोक तो घेण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लावतात. दरवर्षी लाखो चाहते नवीन सिरीजच्या लाँचची आतुरतेने वाट पाहतात आणि विक्री सुरू होताच, दुकानांबाहेर तासनतास उभे राहून आयफोन विकत घेतात. देशाच्या प्रत्येक राज्यात असे दृश्य दिसून येते, परंतु तुम्हाला माहित आहे का की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आयफोन विकले जातात?
नुकताच एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये सर्वाधिक आयफोन खरेदी करणाऱ्या राज्यांची माहिती देण्यात आली आहे. तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की, दिल्ली किंवा बंगळूरू यापैकी एखादे शहर पहिल्या क्रमांकावर असेल, पण हे उत्तर चुकीचे आहे.
अहवालानुसार, आयफोनच्या विक्रीच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत देशात विकल्या गेलेल्या एकूण आयफोनपैकी 25 टक्क्यांहून अधिक आयफोन एकट्या महाराष्ट्रात खरेदी केले गेले आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त, गुजरात (11%) दुसऱ्या क्रमांकावर तर दिल्ली (10%) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या अहवालात भारतीय ग्राहकांच्या पसंतीबद्दलही काही मनोरंजक माहिती समोर आली आहे.
या अहवालातून आणखी एक रंजक माहिती समोर आली आहे की, प्रत्येक 5 पैकी 1 ग्राहक आपला जुना आयफोन बदलून नवीन मॉडेल खरेदी करत आहे.
हे देखील वाचा: iPhone 17 Series launch: एकच झलक, सबसे अलग! आतापर्यंतचा सर्वात पातळ iPhone लाँच, जाडी केवळ 5.6 मिमी; किंमत वाचून बसेल धक्का
Apple च्या नवीन आयफोन 17 सिरीजमधील प्रो मॉडेल्स भारतात लाँच करण्यात आले आहे. कंपनीने मंगळवारी ‘Awe Dropping’ ईव्हेंट आयोजित केला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने Apple iPhone 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमधीस प्रिमियम मॉडेल्स म्हणजेच iPhone 17 Pro आणि 17 Pro Max देखील काल भारतात लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही मॉडेल्सची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.
iPhone 17 Pro मॉडेल्समध्ये A19 Pro चिप देण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या हे दोन्ही प्रो मॉडेल्स iOS 26 वर आधारित आहे. कंपनीच्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना कंपनीचे सिईओ टिम कूक यांनी प्री-रिकॉर्डेड ईव्हेंटची घोषणा केली, जो Apple ची वेबसाईट आणि युट्यूब चॅनेलवर लाइवस्ट्रीम करण्यात आला होता. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या डिव्हाईसमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि अपग्रेड्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही डिव्हाईस अॅपल इंटेलिजेंस सूटच्या सर्व आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) फीचर्सना सपोर्ट करतात