India Pakistan War: तुमच्या घरावरून उडतंय कोणतं विमान? या Website च्या मदतीने लागेल ठाणपत्ता
22 एप्रिल रोजी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम भागात दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावेळी अनेक निष्पाप भारतीयांचा बळी गेला. हा हल्ला पाकिस्तानने केल्याचा आरोप भारताने केला. यानंतर पाकिस्तानला शिक्षा करण्यासाठी भारताने त्यांना केला जाणार पाणीपुरवठा बंद केला. शिवाय ऑपरेशन सिंदूर देखील राबवण्यात आलं. यावेळी भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर 8 मे रोजी रात्री पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि भारताने हा हल्ला परतवून लावला.
एवढचं नाही, पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याचं भारताने प्रत्युत्तर देखील दिलं. या सर्व परिस्थितीदरम्यान सतत कानावर येणारे शब्द म्हणजे विमान आणि ड्रोन. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश सध्या ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. याशिवाय विमानाचा देखील वापर केला जात आहे. पण यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. एखादा ड्रोन किंवा विमान आपल्या घरावरून गेलं तर काय, असा प्रश्न सतत सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. यासंबंधित सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज देखील व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता आम्ही तुमच्यासोबत काही महत्त्वाची माहिती शेअर करणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही विमानाची माहिती चेक करू शकणार आहात. जर तुम्हाला तुमच्या घरावरून एखादं विमान जाताना दिसलं तर तुम्ही स्वत: चेक करू शकता की हे विमान कोणतं आहे. यासाठी तुम्हाला केवळ मोबाईल किंवा लॅपटॉप आणि वेबसाईटची गरज आहे. एक अशी वेबसाईट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या लोकेशनवरून उडत असलेल्या विमानाबद्दल माहिती मिळवू शकता.
खरं तर, flightradar24 Dot Com नावाचे एक पोर्टल आहे. ज्याच्या मदतीने तुमच्या घरावरून कोणतं विमान उडतं आहे, याबाबत माहिती मिळवू शकता. हे विमान जर प्रवासी विमानांपैकी एक असेल तर याबाबत तुम्हाला लगेच माहिती दिली जाणार आहे. मात्र जर सैन्य दलातील विमान असेल तर त्यासंबंधित माहिती मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
flightradar24 वर जगभरातील जवळपास सर्व विमानं पिवळ्या रंगात दाखवण्यात आली आहेत. इथे तुम्ही अधिक कमर्शियल एयरलाइंस पाहू शकता.
flightradar24 वर तुमच्या घरावरून किंवा घराभोवती उडणाऱ्या विमानाच्या आयकॉनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनवर त्या विमानाची माहिती तपासू शकता. या तपशीलांमध्ये, आपल्याला विमानाचे नाव आणि विमान कुठे जात आहे याबद्दल माहिती मिळते. इंटरनेट जगात असे अनेक पोर्टल आहेत जे फ्लाइट ट्रॅकिंगची सुविधा देतात. अशा परिस्थितीत तुम्ही इतर पोर्टल्सचीही मदत घेऊ शकता.