Instagram चं हे फीचर लवकरच होणार बंद, युजर्सनी दर्शवली नापसंती; Adam Mosseri काय म्हणाले?
तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचं नोट्स फीचर आठवतयं का? हो, तेच फीचर जिथे तुम्ही तुमची आवडती गाणी, तुमचे विचार आणि तुमच्या भावना शेअर करू शकता. पण आता लवकरच हे फीचर बंद केलं जाणार आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, आता लवकरच नोट्स फीचर बंद केलं जाणार आहे. युजर्सनी या फीचरला नापसंती दर्शवल्यामुळे हे फीचर बंद केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इंस्टाग्राम आता एक वैशिष्ट्य काढून टाकत आहे जे सुरुवातीला प्लॅटफॉर्मला अधिक ‘मजेदार आणि सामाजिक’ अनुभव देण्यासाठी सादर केले गेले होते. हे फीचर म्हणजे नोट्स. इंस्टाग्रामच्या चॅटबॉक्समध्ये वरच्या बाजूला तुम्हाला नोट्स शेअर करण्याचं ऑप्शन दिलं जातं. या ठिकाणी तुम्ही तुमची आवडती गाणी, तुमचे विचार, भावना अशा अनेक गोष्टी शेअर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
याशिवाय तुम्ही इतर युजर्सनी शेअर केलेले नोट्स देखील इथे पाहू शकता. त्यांच्या नोट्सना रिप्लाय करू शकता आणि ते नोट्स लाईक देखील करू शकता. मात्र आता हे फीचर बंद केलं जाणार आहे. या नोट्स मर्यादित काळासाठी दृश्यमान होत्या आणि फक्त अपलोडर ज्या लोकांना फॉलो करत होता त्यांनाच दृश्यमान होत्या. कंपनी प्रमुखांच्या मते, हे वैशिष्ट्य इंस्टाग्राम युजर्सना तितके आवडले नव्हते. याच कारणामुळे आता हे फीचर बंद केलं जाणार आहे.
इंस्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये कंटेंट नोट्स फीचर बंद करण्याची माहिती दिली आहे. या वैशिष्ट्यासह, पोस्ट आणि रील्सवरील नोट्स तीन दिवसांसाठी दृश्यमान होत्या. गेल्या जुलैमध्ये लाँच झाल्यानंतर, इंस्टाग्रामने हे प्लॅटफॉर्म “सामाजिक आणि मजेदार” बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु प्रत्यक्षात “त्याला फारसे स्वीकारले गेले नाही.” खरं तर इंस्टाग्राममध्ये रिल्स, पोस्ट आणि चॅटबॉक्स अशा तीन ठिकाणी नोट्स फीचर उपलब्ध होत. त्यामुळे आता हे फीचर तिन्ही ठिकाणाहून काढलं जाणार आहे की, की केवळ रिल्स आणि पोस्टवरून याबाबत अद्याप माहिती नाही.
कंपनी प्रमुखांनी यावर भर दिला की इंस्टाग्राम असे फीचर्स बंद करण्याची तयारी करत आहे, जे लोकांना फारसे पसंत नाही. युजर्सना नको असलेले फीचर्स बंद करून कंपनी मित्रांमधील सामाजिक संवाद सुधारण्यासाठी नवीन मार्गांचा शोध घेईल. म्हणजेच जुने फीचर्स जरी बंद केले जात असले तरी देखील लवकरच नवीन अपडेट देखील येणार आहे. मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत इंस्टाग्राम आणि इतर अॅप्स लवकरच कम्युनिटी नोट्सची चाचणी सुरू करतील.