iphone (Photo Credit- X)
iPhone 17 Series च्या लॉन्चला आता फक्त एक आठवडा बाकी असताना, Apple च्या नवीनतम iPhone 16e च्या किमतीत मोठी घट झाली आहे. एकाच झटक्यात या फोनची किंमत ₹10,000 पेक्षाही जास्त कमी झाली असून, सध्या यावर मोठा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम संधी आहे.
यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात लाँच झालेल्या iPhone 16e मध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. पातळ ॲल्युमिनियम डिझाइन असलेला हा फोन Apple A18 चिपसेट आणि 8GB रॅम सह सुसज्ज आहे. यात FaceID सेन्सर आणि एक कस्टमाइजेबल ॲक्शन बटन देखील आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, या फोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सलचा सिंगल लेन्स कॅमेरा आहे. तर, व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी समोरच्या बाजूला 12MP लेन्स देण्यात आला आहे. यासोबतच, या फोनमध्ये Apple Intelligence फीचर्सचाही समावेश आहे.
भारतात ₹59,900 या किमतीत लाँच झालेला हा फोन आता Vijay Sales च्या वेबसाइटवर ₹52,490 मध्ये लिस्टेड आहे. म्हणजेच, फोनच्या मूळ किमतीपेक्षा जवळपास ₹7,400 कमी.
याव्यतिरिक्त, जर तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला, तर तुम्हाला ₹3,500 चा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. अशा प्रकारे, एकूण ₹10,000 पेक्षा जास्त सवलत मिळवून तुम्ही हा फोन ₹50,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा जुना फोन देऊन आणखी डिस्काउंट मिळवू शकता.