IPHONE ( फोटो सौजन्य- PINTEREST)
गेल्या काही वर्षांत देशात Apple कंपनीने iPhone उत्पादन वेगाने वाढले आहे. टाटा समूहाच्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सने तामिळनाडूतील होसूर येथील त्यांच्या नवीन कारखान्यात आयफोनचे उत्पादन सुरू केले आहे. आयफोनच्या उत्पादनात चीनचा मोठा वाटा आहे. चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेने लादलेले मोठे शुल्क टाळण्यासाठी,Apple भारतात iPhone उत्पादन वाढवण्याची योजना आखात आहे.
मे महिन्यात लाँच होणारे “हे” आहेत स्मार्टस्फोन, जाणून घ्या फीचर्स
टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या या कारखान्यात iPhone जुने मॉडेल असेंब्ली लाईनवर तयार केले जातील. Reuters च्या एका वृत्तपत्रानुसार या प्रकरणाची माहिती असलेल्या नुसार बेंगळुरूजवळ कर्नाटकात बांधण्यात येणाऱ्या Apple च्या सर्वात मोठ्या कंत्राटी उत्पादक Foxconnच्या कारखान्यात लवकरच आयफोनचे उत्पादन सुरू होणार आहे. या कारखान्यात दर तासाला 300-500 आयफोन युनिट्स तयार करता येतात. iPhone 16 आणि 16e येथे असेंबल केले जातील. हा कारखाना पूर्ण क्षमतेने काम पूर्ण करेल तेव्हा त्यातून अंदाजे 50,000 नोकऱ्या निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
TATA ELECTRONICS, Apple आणि Foxconn यांनी टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. आयफोनच्या निर्मितीमध्ये चीनचा वाटा 75 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षात Foxconn चा भारतातील महसूल दुप्पट होऊन जवळपास 1.7 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. Foxconn कामगारांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Foxconnचे देशात सुमारे 80,000 कामगार आहेत. ही तैवानी कंपनी आयफोनची सर्वात मोठी उत्पादक आहे.
अलिकडेच, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, गेल्या आर्थिक वर्षात देशातून स्मार्टफोनच्या निर्यातीत आयफोनचा वाटा सुमारे 1.5 लाख कोटी रुपये होता. त्यांनी सांगितले होते की सरकारच्या 22,919 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स घटक योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे पुढील काही आठवड्यात जारी केली जातील. या वर्षी, Foxconnने सुमारे दशलक्ष आयफोन युनिट्स असेंबल करण्याची योजना आखली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात स्मार्टफोनच्या सुट्यांच्या आयातीवर जाहीर केलेल्या कर सवलतीचा फायदा फॉक्सकॉनला होऊ शकतो. Apple देशात AirPods, MacBook आणि iPad उत्पादन सुरू करण्याची योजना आखत आहे. Foxconnच्या हैदराबाद प्लांटमध्ये निर्यातीसाठी AirPods उत्पादन लवकरच सुरू होऊ शकते.
Vivo T3 Ultra ची किंमत भारतात पुन्हा झाली कमी, नवीन किंमत जाणून घ्या