iQOO 13 चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, तब्बल इतकी आहे किंमत! असे आहेत स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स
iQOO 13 स्मार्टफोन भारतात काही महिन्यापूर्वी लाँच करण्यात आला होता. डिसेंबर 2024 मध्ये हा स्मार्टफोन लीजेंड आणि नार्डो ग्रे कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हा स्मार्टफोन एका नव्या व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आता एका नव्या रंगात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. स्मार्टफोनची डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स इतर व्हेरिअंटप्रमाणेच आहेत, मात्र याचा रंग बदलण्यात आला आहे.
iQOO 13 हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये डेडिकेटेड गेमिंग चिप देण्यात आली आहे आणि यामध्ये 6,000mAh बॅटरी देखील आहे. iQOO 13 मध्ये 144Hz 2K LTPO AMOLED डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. नवीन कलर व्हेरिअंट लवकरच खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
iQOO 13 च्या नवीन कलर व्हेरिअंट Ace Green ची किंमत 12GB + 256GB ऑप्शनसाठी 54,999 रुपये आणि 16GB + 512GB ऑप्शनसाठी 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. आता नव्या व्हेरिअंटनंतर हा स्मार्टफोन तीन रंगत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. ज्यामध्ये लीजेंड आणि नार्डो ग्रे कलर ऑप्शन्स यांचा देखील समावेश आहे कंपनीने प्रेस रिलीजमध्ये अस सांगितलं होतं की, नवीन ग्रीन कलर व्हेरिअंट देशात 12 जुलैपासून रात्री 12 वाजल्यापासून Amazon आणि iQOO India ई-स्टोरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Built different. Ready for everything.
The #iQOO13 stands alone with IP68 & IP69 dust and water resistance* — flagship-grade durability that laughs in the face of limits. 🌊💪
And with an AnTuTu score of 3 million+**, it’s not just setting the bar — it’s shattering it. 🚀… pic.twitter.com/YhDvET6PeZ
— iQOO India (@IqooInd) July 4, 2025
iQOO 13 मध्ये 6.82-इंच 2K (1,440×3,186 पिक्सेल्स) LTPO AMOLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल आहे. हे 3nm ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि इन-हाउस गेमिंग Q2 चिपने सुसज्ज आहे. हीट डिसिपेशनसाठी फोनमध्ये 7,000 sq mm वेपर चेंबर आहे. हँडसेट 16GB पर्यंत LPDDR5X Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज ऑफर करते. फोनमध्ये Android 15-बेस्ड Funtouch OS 15 आहे.
Microsoft आणि Apple ला टाकलं मागे! Nvidia ने बनवला नवा रेकॉर्ड, इतिहास बदलणार का?
फोटोग्राफीसाठी, iQOO 13 मध्ये 50-मेगापिक्सेल मेन सेंसर, 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी 32-मेगापिक्सेल सेंसर देण्यात आला आहे. iQOO 13 मध्ये 6, 000mAhबॅटरी ददेण्यात आली आहे जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, GPS, आणि USB 3.2 Gen 1 Type-C हे कनेक्टिविटी ऑप्शन देण्यात आले आहेत.