Upcoming Smartphone: सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी आणि आकर्षक डिझाईनसह लाँच होणार हा 5G फोन, 10 हजरांहून कमी असणार किंमत
जून महिन्यात iQOO चा बजेट स्मार्टफोन पावरफुल फीचर्ससह एंट्री करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांतच हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे. ज्यांना नवीन स्मार्टफोनची गरज आहे, पण बजेट कमी आहे, अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन फायद्याचा ठरणार आहे. कारण या स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील त्यामध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे युजर्स दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर करू शकतात.
iQOO Z10 Lite 5G भारतात याच महिन्यात लाँच केला जाणार आहे. याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा देखील केली आहे. कंपनीने अधिकृतपणे आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच त्याच्या बॅटरीचा खुलासा झाला आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत कंपनीने या बॅटरीबाबत माहिती दिली आहे. शिवाय स्मार्टफोनच्या डिझाईनचा टिझर देखील शेअर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
Meet the beast that outlasts them all. 🔋
Introducing the all new #iQOOZ10Lite — the Segment’s Biggest Battery 5G Smartphone*, packed with a massive 6000mAh battery that keeps you going through every class, every game, every moment.
This is just the beginning. Get ready to… pic.twitter.com/GBupAlbwtA
— iQOO India (@IqooInd) June 6, 2025
आगामी स्मार्टफोन iQOO Z10 आणि iQOO Z10x व्हेरिअंट्सचा भाग असणार आहे. iQOO Z10 आणि iQOO Z10x एप्रिलमध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. आता या सिरीजमध्ये आणखी एका नव्या स्मार्टफोनचा समावेश होणार आहे. iQOO Z10 मध्ये 7,300mAh बॅटरी होती तर Z10x मध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली होती. अपकमिंग Z10 Lite व्हेरिअंटमध्ये 6,000mAh बॅटरी असणार आहे.
कंपनीने X पोस्टमध्ये कंफर्म केलं आहे की, iQOO Z10 Lite 5G भारतात 18 जून रोजी लाँच केला जाणार आहे. iQOO चा दावा आहे की, हँडसेट सेगमेंटमधील सर्वात मोठ्या बॅटरीसह लाँच केला जाणार आहे. एक्स पोस्टवरून अशी माहिती मिळाली आहे की, फोनची भारतातील किंमत 10 हजार रुपयांहून कमी असणार आहे. Amazon वर आगामी स्मार्टफोनची माइक्रोसाइट लाईव्ह झाली आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची विक्री Amazon द्वारे केली जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.
पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, iQOO Z10 Lite 5G मध्ये 6,000mAh बॅटरी असणार आहे. हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा यूनिट दिला जाणार आहे. मागील पॅनलच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात पिल-शेप्ड मॉड्यूलमध्ये दोन सर्कुलर कॅमेरा स्लॉट वर्टिकली सेट आहेत. टॉप एजवर स्पीकर ग्रिल आणि राइट एजवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आलं आहे.