फोटो सौजन्य - सोशल मिडीया
आपण आपल्या फोनमध्ये अनेक गोष्टी सेव्ह करून ठेवतो. एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो की त्या ठिकाणाचे फोटो, एखाद्या कार्यक्रमाचे फोटो आपण आठवणी म्हणून सेव्ह करतो. सध्या मोबाईलशिवाय कोणतंही काम करणं कठीण आहे. त्यामुळे आपण आपल्या अनेक महत्त्वाच्या फाईल्स मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतो. पण या सगळ्या गोष्टींमुळे मोबाईलचं स्टोरेज फुल होतं. अनेकदा असं होतं की आपण एखाद्या खास क्षणाचे फोटो काढत असतो आणि आपल्याला मोबाईलमध्ये स्टोरेज फुल झाल्याचं नोटिफिकेशन येते.
काहीवेळा आपल्याला दर २ दिवसांनी स्टोरेज फुल झाल्याचं नोटिफिकेशन येते. स्टोरेज फुल झाल्यामुळे आपण अनेक गोष्टी मोबाईलमधून डिलीट करण्यास सुरुवात करतो. पण अशावेळी तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी सुध्दा डिलीट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या फोनमधील स्टोरेज अगदी सहज मॅनेज करू शकता. तुम्ही Android युजर्स आहात आणि तुमच्या मोबाईलला दर दोन दिवसांनी स्टोरेज फुल झाल्याचं नोटिफिकेशन येत असेल तर तुम्ही पुढील टीप्स फॉलो करू शकता.
सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन ॲप्स आणि स्टोरेज क्लिन करा. मोबाईलमधील अनावश्यक आणि न वापरलेले ॲप्स डिलीट करा. तुमच्या फोनमध्ये असे काही ॲप्स असतात जे तुम्ही क्वचितच वापरता. पण या ॲप्समुळे फोनचं स्टोरेज फुल होतं. तसेच याशिवाय काही ॲप्स देखील फोनमध्ये बाय डिफॉल्ट येतात. असे ॲप्स तुम्ही फोनमधून डिलीट करू शकता. कमी वापर होणाऱ्या ॲप्सचा डाटा आणि कॅचे क्लिअर करा. क्लाऊड स्टोरेजचा वापर करा. क्लाऊड स्टोरेजमध्ये जाऊन व्हिडीओ बॅकअप घ्या. त्यानंतर हे व्हिडीओ तुम्ही फोनमधून डिलीट करू शकता. गुगल फाइलमधील लार्जेस्ट फाइल हटवा. यामुळे स्टोरेज क्लिअर होण्यास मदत होईल.
अनेक वेळा आपण डाऊनलोड करून गाणी ऐकतो. पण यामुळे मोबाईलचं स्टोरेज फुल होतं. त्यामुळे गाणी ऐकण्यासाठी स्ट्रीमिंग ॲप्सचा वापर करावा. व्हॉट्सअॅपमधील अनावश्यक चॅट्स डिलीट करा. तुमचा फोन सतत अपडेट करत राहा. हल्ली सगळेच सोशल मिडीयाचा वापर करतात. पण सोशल मिडीया वापरताना काहीवेळा नको असलेल्या फाइल्स, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावरून तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड होतात. हे टाळण्यासाठी तुमच्या सर्व सोशल मीडिया ॲप्सच्या सेटिंग्जवर जा. तेथे ऑटो डाउनलोड सेटिंग चालू असेल, तर ते बंद करा. यामुळे तुमच्या फोनमध्ये कोणत्याही फाइल्स आपोआप डाउनलोड होणार नाहीत.