(फोटो सौजन्य: Pinterest)
खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती कमी केल्यांनतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. कंपनीनेही या संधीचा फायदा उचलत आपल्या सर्व्हिसमध्ये अनेक बदल घडवून आणले. नेटवर्क मजबूत करण्यासाठी बीएसएनएलकडून सातत्याने नवनवीन पावले उचलली जात आहेत. आता बीएसएनएलने केरळमध्ये 5 हजार 4G साइट सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे.
कंपनीने देशभरात 65 हजार 4G साइटवर काम केले आहे. विशेष म्हणजे भारतीय टेक कंपन्यांनी बीएसएनएलच्या 4G साइट्सवर काम केले आहे. एवढेच नाही तर BSNL चे 4G टॅरिफ जगातील सर्वात कमी आहे. बीएसएनएलकडून 1 लाख साइटवर काम सुरू आहे. वास्तविक कंपनीचे लक्ष्य हे आहे की ती 1 लाख 4G साइट्सवर काम करत आहे.
या कारणामुळे Smartphone होतो ओव्हरहीट? तुम्हीही ही चूक तर करत नाही
बीएसएनएलचा हा शेवटचा टप्पा असणार नाही. याशिवाय कंपनी अनेक गोष्टींवर काम करत आहे. नेटवर्क पुढे नेण्यासाठी कंपनी सतत काम करत आहे. बीएसएनएल देशभरातील अनेक भागात नवीन साइट्स सुरू करण्याचा विचार करत आहे. 1 लाख 4G साइट्सनंतर, BSNL आपले नेटवर्क मजबूत करण्यासाठी आणखी काम सुरू करेल. यामुळे आता येत्या काळात कंपनीच्या सर्व्हिसमध्ये अनेक नवीन घडल्याचे दिसून येईल.
BSNL 1 लाख 4G साइट्सनंतर 5G नेटवर्क सेट करण्यावर काम करेल. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) देखील बीएसएनएलला मदत करण्यास तयार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) देखील BSNL चे नेटवर्क अपग्रेड करण्यास तयार आहे. टाटाच्या मदतीने, BSNL ला त्यांचे 4G नेटवर्क 5G वर अपग्रेड करायचे आहे. BSNL सॉफ्टवेअर अपग्रेडसह 4G चे 5G नेटवर्कमध्ये रूपांतर करत आहे. BSNL एअरटेल प्रमाणे देशभरात 5G NSA चा विस्तार करत आहे. तर, BSNL कडून 5G SA ची टेस्टिंग केली जात आहे. मात्र, ते अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नाही.
कॉलवर बोलनाता Background Noise चा त्रास होतोय? Android चे हे फिचर तुमची मदत करेल
सध्या कंपनीकडून टेंडर तपासले जात आहे. दिल्लीत 5G SA ची टेस्टिंग केली जात आहे. माहितीनुसार, यावर्षी बीएसएनएल आपल्या 5G सर्व्हिसचे काम पूर्ण करेल, ज्यामुळे युजर्सना लवकरच दर्जेदार नेटवर्कचा लाभ घेता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, मागेच कंपनीने आपले नवीन 4G सिमकार्ड आणि स्मार्टफोनदेखील लाँच केले होते.