Jio ची धमाकेदार ऑफर! केवळ 100 रुपयांत मिळणार 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे, जाणून घ्या सविस्तर
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन ऑफर्स घेऊन येत असते. शिवाय कंपनी नवीन रिचार्ज प्लॅन्स देखील लाँच करत असते. आता देखील टेलीकॉम कंपनी Reliance Jio ने आता पुन्हा त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज ऑफर आणली आहे. हा रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. कारण या रिचार्ज प्लॅनची किंमत अत्यंत कमी आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे मिळणार आहेत.
Jio Choice Number: तुम्हालाही जिओचा खास VIP नंबर पाहिजे आहे का? मग, आताच फॉलो करा या स्टेप्स
जिओने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज ऑफर सुरु केली आहे. युजर्सना केवळ 100 रुपयांत JioCinema Premium ची सुविधा मिळणार आहे. खरं तर JioCinema Premium ची सुविधा 299 रुपयांत दिली जाते. मात्र आता कंपनीने सुरु केलेल्या या नवीन ऑफरमध्ये युजर्सना आता 100 रुपयांत JioCinema Premium ची सुविधा मिळणार आहे. ही ऑफर लिमिटेड टाइमसाठी उपलब्ध आहे. ही ऑफर अशा युजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे, जे मोबाइल किंवा टीवीवर वेब सीरीज, चित्रपट आणि स्पोर्ट्स पाहणं आवडतं, पण हे लोकं महागडे प्लॅन्स खरेदी करु शकत नाही. त्यामुळे अशा युजर्ससाठी ही ऑफर फायद्याची ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
100 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे मिळणार आहेत. या प्लॅनसोबत 90 दिवसांची व्हॅलिडिटी, 5GB इंटरनेट डेटा आणि फ्री JioCinema Premium सब्सक्रिप्शन मिळणार आहे. हा प्लॅन अशा लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे, ज्यांना कमी खर्चात संपूर्ण मनोरंजनाचा आनंद घ्यायचा आहे.
यापूर्वी JioCinema Premium ची सुविधा केवळ 299 रुपये आणि यापेक्षा जास्त किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध होती. ज्यामध्ये युजर्सना मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर प्रीमियम कंटेंट पाहण्याची सुविधा मिळते. मात्र आता ही सुविधा केवळ 100 रुपयांत मिळणार आहे. 100 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्स 90 दिवसांपर्यंत JioCinema वर लेटेस्ट मूवीज, वेब सीरीज आणि लाइव स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. हा एक वाऊचर प्लॅन आहे आणि या प्लॅनचा आनंद घेण्यासाठी तुमच्या जिओ नंबरवर एक सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. हा प्लॅन तुमच्या जिओ सिमला अॅक्टिव्ह ठेवत नाही, म्हणजेच कॉल आणि मेसेजसाठी बेसिक प्लॅनची आवश्यकता आहे.
जिओने सुरु केलेली ही नवीन ऑफर युजर्ससाठी वरदान ठरणार आहे. कारण या प्लॅनमध्ये युजर्सना कमी पैशांत युजर्सना ओटीटीचा आनंद घेता येणार आहे. जर तुम्हीही जिओ युजर असाल आणि मनोरंजनाची आवड असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.