2024 चा अहवाल सादर, Internet Shutdown मध्ये म्यानमार पहिल्या क्रमांकावर! भारत कोणत्या स्थानावर? जाणून घ्या
भारतात इंटरनेट शटडाऊनच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. खरं तर आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या अनेक अहवालांमध्ये इंटरनेट शटडाऊनच्या घटनांमध्ये भारत आघाडीवर होता. मात्र 2018 मध्ये पहिल्यांदाच, इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीत भारत पहिल्यांदाच आघाडीवर नव्हता. आता हीच घटना पुन्हा एकदा झाली आहे. म्हणजेच 2024 चा सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये भारत आघाडीवर नाही.
2024 मध्ये म्यानमारमध्ये सर्वाधिक इंटरनेट शटडाऊनच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे इंटरनेट शटडाऊनच्या घटनामंध्ये 2024 साली म्यानमार प्रथम क्रमांकावर आहे तर भारताने दुसरा क्रमांक गाठला आहे. 2024 मध्ये म्यानमारमध्ये सर्वाधिक इंटरनेट शटडाऊनच्या घटना घडल्या आहेत, असे अॅक्सेस नाऊच्या अहवालातून समोर आले आहे. येथे 85 वेळा इंटरनेट शटडाऊन झाले होते. या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये 84 वेळा इंटरनेट शटडाऊनच्या घटना घडल्या आहेत. जगभरात इंटरनेट बंद होण्याच्या घटना वाढत आहेत. 2023 मध्ये 39 देशांमध्ये 283 वेळा इंटरनेट शटडाऊनच्या घटना घडल्या आहेत, तर 2024 मध्ये 54 देशांनी 296 वेळा इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिले. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंटरनेट शटडाऊनच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी आर्थिक नुकसान होते. मोठ्या मोठ्या कंपन्यांना त्यांची कामं थांबवावी लागतात. परिणाम अनेक कामं रखडली जातात. मात्र सराकर कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या कारणासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश देत असते. आणीबाणीच्या परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सरकार इंटरनेट बंदचा आदेश दिला जातो.
84 वेळा इंटरनेट शटडाऊनच्या घटना घडल्यानंतर, भारत या यादीत म्यानमारपेक्षा थोडा मागे आहे. भारतात, परीक्षा आणि निवडणुकांमध्ये कॉपी रोखण्यासाठी प्रामुख्याने वाद, निषेध, सांप्रदायिक हिंसाचार यामुळे इंटरनेट बंद करण्यात आले आहे. देशात निदर्शनांमुळे 41 वेळा आणि जातीय हिंसाचारामुळे 23 वेळा इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये जास्तीत जास्त 21 वेळा, जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणामध्ये प्रत्येकी 12 वेळा इंटरनेट बंद करण्यात आले. मणिपूरमध्ये दीर्घकाळ चाललेल्या हिंसाचारामुळे, इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश अनेक वेळा देण्यात आले आहेत.
हरवलेल्या वस्तू शोधणं झालं आणखी सोपं, भारतात लाँच झाला boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर; केवळ इतकी आहे किंमत
म्यानमार आणि भारताव्यतिरिक्त, या यादीत पाकिस्तान, रशिया, युक्रेन, पॅलेस्टाईन आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये 21 वेळा, रशियामध्ये 12 वेळा, युक्रेनमध्ये 7 वेळा, पॅलेस्टाईनमध्ये 6 वेळा आणि बांगलादेशमध्ये 5 वेळा इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये, गेल्या वर्षी 8 फेब्रुवारी रोजी, सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी, देशभरात मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आले होते. दुसऱ्या देशामुळे दुसऱ्या देशात इंटरनेट बंद पडल्याच्या अशा अनेक घटनाही समोर आल्या आहेत. उदाहरणार्थ, रशियामुळे, युक्रेनमध्ये 7 वेळा इंटरनेट बंद करण्यात आले. त्याचप्रमाणे, जेव्हा इस्रायलने गाझावर हल्ला केला तेव्हा पॅलेस्टाईनमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले. दुसऱ्या एका प्रकरणात, चीन आणि थायलंडने म्यानमारमध्ये फोन आणि इंटरनेट सेवा बंद केल्या होत्या.