तुमची रुम होणार Disco Club! LG घेऊन आलाय जबरदस्त आवाजवाले स्पीकर्स, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
भारताच्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सपैकी एक असलेल्या LG ने ऑडियो लाइन-अपमध्ये नवीन स्पीकर्स लाँच केले आहेत. कंपनीने जबरदस्त साऊंडसह LG XBOOM सीरिज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये XG2T, XL9T, आणि XO2T मॉडेल्सचा समावेश आहे. देशभरातील संगीत प्रेमींसाठी घराच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी ही स्पिकर सिरीज फायदेशीर ठरणार आहे. उत्तम आवाजाचा दर्जा, कुठेही घेऊन जाऊ शकण्याची सुधारित क्षमता, आणि लाईनटिंग फिचर्स यांसह उत्तम ऑडिओ अनुभव देण्यासाठी हे नवीन फीचर्स लाँच करण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा- Google Map Update: इंटरनेटशिवाय गुगल मॅप दाखवणार रस्ता, अशा पद्धतीने सेव्ह करा ऑफलाईन लोकेशन
अत्याधुनिक XBOOM सीरिजसह, LG इलेक्ट्रॉनिक्स सातत्याने ऑडियो क्षेत्रात नवीन कल्पना आणत आहे, ज्यामध्ये अशा डिव्हाईसच्या ऑफर दिली जाते जे भारदस्त आवाज, स्टाईलिश डिझाइन, आणि कुठेही घेऊन जाण्याची क्षमता देतात. प्रत्येक मॉडेलमध्ये सर्वोत्तम आवाजाचे आऊटपुट आणि समाविष्ट असलेले लाईटनिंग आहे, ज्यामुळे XBOOM सीरिज सर्व प्रसंगांसाठी निवड बनते. ते कुटूंबाचे एकत्रीकरण असो, बाहेरील साहसी नियोजन किंवा घरीच सायंकाळचे काही कार्यक्रम असोत, तुम्ही कुठेही XBOOM सीरिज वापरू शकता.
होम एंटरटेंटमेंट LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे संचालक ब्रेन जंग म्हणाले, “आमच्या नवीन XBOOM सीरिजच्या सुरुवातीसह, LG ने तंत्रज्ञानासह सोयीस्करपणा सुद्धा असावा याकरिता ऑडियो उत्पादने आणले आहेत. ही मॉडेल्स आमच्या ग्राहकांचा आवाजाचा अनुभव सुधारण्यासाठी तयार करण्यात आली आहेत, प्रत्येक वातावरणात भारदस्त आवाज, लाईटनिंग फिचर्स, आणि टिकाऊपणा मिळण्यासाठी हे नवीन डिव्हाईस लाँच करण्यात आले आहे. तुम्ही प्रत्यक्ष प्रसंग आयोजित करत असाल, साहसी नियोजन करत असाल, किंवा घरीच आराम करत असाल, तरीसुद्धा XBOOM सीरिज असे उत्पादन देते ज्यामुळे तुमचा ऑडियोचा अनुभव सुधारतो.”
LG XBOOM XL9T हा पार्टी स्पीकर आहे जो उच्च-दर्जाच्या आवाज अनुभवासाठी तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये 1000W आऊटपुट आहे जो 8 इंच वूफर्स आणि 3 इंच ट्वीटर्सच्या माध्यमातुन डिलीव्हर केला जातो. बास एनहांसमेंट अल्गोरिदमने समाविष्ट असलेला XL9T संगीताचा उत्तम अनुभव येण्यासाठी सखोल आणि सर्वोत्तम आवाज देतो. त्यामध्ये वूफर लाइटिंगसह नवीन पिक्सेल LED सुद्धा आहे. एखादा व्यक्ती नवीन टेक्स्ट, कॅरेक्टर्स किंवा इमोजी तयार करू शकतो ज्यामुळे , क्लब सारखे वातावरण तयार होते, जे पार्टीसाठी उत्तम असते. यामध्ये वॉटर-रेझिस्टंस IPX4 रेटिंग, सोयीस्कर हँडल, आणि बळकट व्हील असल्याने XL9T हा घराबाहेरील कार्यक्रमांसाठी आदर्श आणि विश्वसनीय असुन तो कुठेही घेऊन जाऊ शकतो.
LG XBOOM GO XG2T हा आवाजाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता कुठेही घेऊन जाऊ शकण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. हा कॉम्पॅक्ट 5W पॉवरहाऊस 1.5-इंच वूफर आणि पॅसिव्ह रेडिएटरसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये त्याच्या आकारासाठी उच्च दाबाचा आवाज, उत्पादनाचा महत्वाचा भाग असलेल्या बास अल्गोरिदमने सुधारणा करण्यात आली आहे. IP67 रेटिंग आणि US मिलिटरी स्टँडर्ड टिकाऊपणासह कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या XG2T मध्ये 10 तासांपर्यंत प्लेबॅक आहे, ज्यामुळे तो घराबाहेरी साहसी उपक्रमांसाठी योग्य बनतो. त्याच्या कस्टमाइज करण्यायोग्य स्ट्रिंग बॅकपॅकमुळे सायकल, तंबू आणि बऱ्याच ठिकाणी तो नेला जाऊ शकतो. ब्लूटूथ कॉलिंग फिचर्समुळे स्मार्टफोन बाहेर न काढता कॉल घेतले जाऊ शकतात.
LG XBOOM XO2T त्याच्या 360-डिग्री सर्वदिशात्मक (ऑम्निडायरेक्शनल) 20W आवाजासह स्टाईल आणि कार्यक्षमता यांचे एकत्रीकरण करते, सुधारित बास आणि स्पष्ट आवाजाची गुणवत्ता देते. यामध्ये असलेली पारदर्शक काचेच्या प्रभावासह मूड वाढवणारी लाईटनिंग जी मंद, मेणबत्तीसारखा प्रकाश पसरवते आणि ती कोणत्याही परिस्थितीमध्ये एक मोहक वातावरण तयार करते. IP55 पाण्याची प्रतिरोधक क्षमता आणि 15+ तासांची बॅटरी यामुळे XO2T घराबाहेर आणि घरातील वापरासाठी एक उत्तम पर्याय बनतो.
हेदेखील वाचा- Jio यूजर्ससाठी मुकेश अंबानींचं खास गिफ्ट! 11 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार हाय स्पीड इंटरनेट डेटा
ब्लूटूथ 5.3, LG वन टच मोड आणि मल्टी-पॉइंट शेअरिंगमुळे अखंडपणे ऑडिओ अनुभव सुधारतो. या स्पीकर्समध्ये LG TV सह सिनर्जी आहे जी ऑप्टिमाइझ केलेल्या फ्रंट किंवा रिअर सराउंड सेटिंग्ज तसेच स्टिरिओसह प्ले होऊ शकते. तुमच्याकडे वेगळ्या ब्रँडचा टीव्ही असला तरीही, XBOOM स्पीकर तुमच्या टीव्ही/मोबाइल डिव्हाइसशी कनेक्ट केले जाऊ शकतात.
LG XBOOM सीरिज भारतामध्ये 15 नोव्हेंबर 2024 पासून LG.com सह सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म तसेच रिटेल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. त्याच्या किंमती XG2T मॉडेलसाठी 4,990 रूपये XO2T मॉडेलसाठी 12,990 रूपये आणि XL9T मॉडेलसाठी 64,900 रूपये अशा आहेत आणि प्रत्येक मॉडेलनुसार फिचर्स बदलू शकतात.