फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष
Lyne Lancer 19 Pro हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंगला सपोर्ट करतो. यामध्ये अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी असणाऱ्यांसाठी आणि खेळाडूंसाठी देखील हे स्मार्टवॉच एक चांगली निवड ठरणार आहे. Lyne Lancer 19 Pro ला IPX4 रेटिंग मिळाली आहे. याचा अर्थ असा आहे की, हे स्प्लॅश रेजिस्टेंट आहे. या स्मार्टवॉचमध्ये 210mAh बॅटरी देण्यात आली आहे. याबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर हे वॉच 12 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देतो. (फोटो सौजन्य – X)
Lyne Originals expands its wearables lineup with the Lancer 19 Pro Smartwatch, priced at just ₹1,299. It features a large 2.01-inch display, Bluetooth calling, health tracking, IPX4 splash resistance, and reliable battery life designed for everyday comfort and value.… pic.twitter.com/qSTpME7qTG — Gogi Tech (Rajeev) (@gogiinc) December 12, 2025
Line Lancer 19 Pro हे नवीन आणि लेटेस्ट स्मार्टवॉच भारतात 1,299 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. भारतातील मोठ्या ऑफलाइन रिटेल आउटलेट्सवर ग्राहक हे स्मार्टवॉच खरेदी करू शकतात. कंपनीचे हे लेटेस्ट स्मार्टवॉच आतापर्यंत अमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध नाही.
Lyne ने लाँच केलेल्या नवीन फिटनेस ट्रॅकरमध्ये 2.01-इंच टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये ब्लूटूथ 5.3 कनेक्टिविटी आहे आणि iOS 12 आणि त्यानंतरच्या वर्जन आणि Android 9 आणि त्यानंतरच्या वर्जनवाल्या डिव्हाईससोबत कम्पॅटिबल आहे. या वियरेबलमध्ये कंपनीने ब्लूटूथ कॉलिंग फीचर दिले आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स पेयर्ड स्मार्टफोन खिशातून बाहेर काढल्याशिवाय स्मार्टवॉचच्या मदतीने कॉल करू शकतात आणि रिसीव्ह करू शकतात. या स्मार्टवॉचमध्ये व्हॉईस ट्रांसमिशनसाठी इनबिल्ट माइक्रोफोन आणि स्पीकर आहे.
Lyne Lancer 19 Pro मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग आणि ब्लड-ऑक्सीजन सॅचुरेशन (SpO2) ट्रॅकिंगसाठी सेंसर आहे. या डिव्हाईसमध्ये डेडिकेटेड स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत आणि हे अनेक हेल्थ आणि फिटनेस मॉनिटरिंग फीचर्सला सपोर्ट करते. Lyne Lancer 19 Pro मध्ये उपलब्ध एडिशनल फीचर्समध्ये कॉल रिकॉर्डिंग आणि नोटिफिकेशन अलर्ट यांसारख्या खास फीचर्सचा समावेश आहे. स्मार्टवॉच यूजर्सना स्मार्टवॉचनेच त्यांच्या फोनचा कॅमेरा कंट्रोल करण्याची देखील सुविधा देतो. Lyne Lancer 19 Pro सह तुम्हाला एक मॅग्नेटिक रिस्टबँड (स्ट्रॅप) मिळणार आहे. फिटनेस ट्रॅकरमध्ये पाणी आणि घामापासून वाचण्यासाठी IPX4 स्प्लॅश रेजिस्टेंस रेटिंग दिली आहे.
Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या
Lyne Lancer 19 Pro बॉक्समध्ये एक मॅग्नेटिक चार्जिंग केबलसह उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये कंपनीने 210mAh बॅटरी दिली आहे, ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, हे ब्लूटूथ कॉलिंगसह मीडियम वापरासह तीन – चार दिवस वापरले जाऊ शकते. असा दावा करण्यात आला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर डिव्हाईस 12 दिवसांचा स्टँडबाय टाईम ऑफर करते.
Ans: ऑप्टिकल सेन्सरद्वारे त्वचेखालील रक्तप्रवाह मोजून हार्ट रेट ट्रॅक केला जातो.
Ans: साधारण आरोग्य मॉनिटरिंगसाठी ठीक असते, मात्र वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: बहुतेक स्मार्टवॉच फोनशी Bluetooth द्वारे कनेक्ट केल्यावरच पूर्ण फीचर्स देतात. काही मॉडेल्समध्ये LTE सपोर्ट असतो.






