फोटो सौजन्य - pinterest
फेसबुकची मूळ कंपनी असेलेल्या Meta ने आता पुन्हा एकदा एक नवीन AI मॉडेल लाँच केलं आहे. Llama 3.1 असं या AI मॉडेलचं नाव आहे. Llama 3.1 पूर्वीच्या AI मॉडेलपेक्षा अधिक प्रगत तंत्रज्ञानासह तयार करण्यात आलं आहे. याबाबत Meta सीईओ Mark Zuckerberg ने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. Meta च्या Llama 3 या AI मॉडेलमध्ये बदल केल्यानंतर कंपनीने आता Llama 3.1 लाँच करण्यात आलं आहे. Llama 3.1 हे AI मॉडेल Llama 3 पेक्षा अधिक प्रगत आहे.
हेदेखील वाचा – नायजेरियाने Meta ला ठोठावला 22 कोटी रुपयांचा दंड; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
Llama 3.1 या नव्या AI मॉडेल विषयी माहिती देताना Meta सीईओ Mark Zuckerberg ने सांगितलं की, आम्ही आणखी एक मोठे AI मॉडेल लाँच करत आहोत. जर हे मॉडेल यशस्वी झाले, तर या वर्षाच्या अखेरीस Meta जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या AI असिस्टंटच्या यादीत सर्वोच्च स्थानी पोहोचेल. लाखो लोक दररोज AI चा वापर करत आहेत. हे AI मॉडेल लवकरच अधिकाधिक देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे इतर देशातील लोक सुध्दा Meta AI चा वापर करू शकतील. Meta चे नवीन AI मॉडेल अनेक प्रकारे चांगले आणि वेगळे आहे. Llama 3.1 जुन्या मॉडेलपेक्षा अधिक भाषांना समर्थन देते.
हेदेखील वाचा – इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील ‘Made with AI’ लेबल बदललं; Meta ची घोषणा
नुकतेच Meta ने Meta AI नावाचे एक AI मॉडेल लाँच केलं आहे, जे अगदी सहज वापरता येते. लोकांना हे फीचर खूप आवडलं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर युजर्सना Meta AI उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ज्यामुळे युजर्सना एखाद्या गोष्टीविषयी माहिती शोधणं, किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दुसऱ्या ॲपवर स्विच करावं लागतं नाही. युजर्स Meta AI च्या मदतीने फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर अगदी सहज कोणत्याही विषयावरील माहिती शोधू शकतात. Meta AI च्या यशस्वी लाँचिंगनंतर आता कंपनीने Llama 3.1 लाँच केलं आहे.
Llama 3.1 मध्ये एक नवीन फीचर अपडेट कऱण्यात आलं आहे, या फीचरच्या मदतीने प्रतिमा देखील तयार केल्या जातील. तसेच कोणत्याही प्रश्नाचे सोपे आणि अचूक उत्तरं मिळवणं आता अधिक सोपं होणार आहे. हे एक अल्ट्रा-फास्ट मॉडेल असेल, जे कुठेही चालवता येते आणि वेगवेगळी कामे करू शकते. Llama 3.1 च्या मदतीने तुम्ही गणितातील कोणताही कठीण प्रश्न अगदी सहज सोडवू शकता.