(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Aakhri Sawal Movie : UAE मध्ये बंदी, चित्रपट थांबवण्यासाठी जनहित याचिका दाखल… पण भारतात संजय दत्त अभिनीत ‘आखिरी सवाल’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षकांसोबतच राजकारणातील मोठ्या सदस्यांना याची उत्सुकता लागून आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी चित्रपट पाहून त्याचे कौतुक केले होते, तर आता आज राष्ट्रपती भवनातही या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे.
एका बाजूला चित्रपटाभोवतीचे वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सामान्य प्रेक्षकांपासून मोठ्या राजकीय आणि शासकीय व्यक्तींपर्यंत सर्वजण हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचत आहेत. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, ‘आखिरी सवाल’मध्ये नेमकं असं काय आहे, जे पाहिल्यानंतर प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया देण्यास भाग पडत आहे?
यूएईमध्ये बंदी आणि चित्रपटाविरोधात जनहित याचिका दाखल झाल्यानंतरही भारतात मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद हे दर्शवतो की हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून समाज आणि सामान्य माणसाशी थेट जोडलेला एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो.
‘आखिरी सवाल’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरंग यांनी केले आहे. चित्रपटाचे सादरीकरण निखिल नंदा यांनी केले असून निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली आहे. सहनिर्माते म्हणून पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद यांची साथ लाभली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
आजच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत बहुतांश वेळा मसालेदार आणि व्यावसायिक चित्रपटांनाच प्राधान्य दिले जाते. अशा वेळी निखिल नंदा यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार केला आहे. ‘आखरी सवाल’च्या माध्यमातून त्यांनी देशाच्या इतिहासातील त्या पानांना स्पर्श केला आहे, ज्यांवर फार कमी चर्चा झाली आहे. बाबरी मशीद पाडण्याची घटना, महात्मा गांधी यांची हत्या आणि आणीबाणी यांसारख्या विषयांना थेटपणे मांडत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.






