Motorola Edge 2026 ची धडाकेबाज एंट्री! तगड्या फीचर्ससह स्मार्टफोन मार्केटमध्ये सेट करणार नवा ट्रेंड... किंमत जाणून घ्या
किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, नॉर्थ अमेरिकन मार्केटमध्ये या डिव्हाईसचे यूनिवर्सल अनलॉक मॉडेल बेस्ट बाय आणि Motorola.com वर 599.99 डॉलर म्हणजेच सुमारे 57,455 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन पँटोन मार्टिनी ऑलिव्ह रंगात खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Motorola)
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.3-इंच 1.5K ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या नव्या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. Motorola Edge 2026 मध्ये HDR10+ सपोर्ट आणि 5,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i ने सुरक्षित आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7450 प्रोसेसर दिला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये माली-जी615 एमसी2 जीपीयू देखील मिळणार आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये 8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 सह लाँच करण्यात आला आहे.
यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी या नव्या फोनमध्ये 50MP सोनी एलवाईटीआईए 710 प्रायमरी सेंसर आहे, ज्यामध्ये OIS सपोर्ट आहे आणि हा फोन 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. यासोबतच या फोनमध्ये 50MP चे अल्ट्रा-वाइड लेंस देखील दिले आहे, जे मॅक्रो कॅमेऱ्याचे देखील काम करते.
डिव्हाईसमध्ये 10MP ची टेलीफोटो लेंस दिली आहे, ज्यामध्ये 3x ऑप्टिकल झूम आणि ओआईएस सपोर्ट देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50MP चा कॅमेरा दिला आहे. या कॅमेरा सिस्टिमला AI सॉफ्टवेअरचा सपोर्ट मिळणार आहे. ज्यामध्ये बॅकग्राउंड फोटो एन्हान्समेंट इंजिन आणि हलते सब्जेक्ट्स स्टेबल करण्यासाठी ‘ॲक्शन शॉट’ फीचरचा समावेश आहे.
Motorola Edge 2026 मध्ये 60W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.
Ans: मोटोरोला Mobility ही मूळतः अमेरिकेतील कंपनी आहे.
Ans: होय, मोटोरोला स्मार्टफोन स्वच्छ अँड्रॉईड अनुभव, चांगली बॅटरी लाइफ आणि मजबूत बिल्ड क्वालिटीसाठी ओळखले जातात.
Ans: होय, मोटोरोलाकडे बजेट, मिड-रेंज आणि प्रीमियम श्रेणीतील अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.






