7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर... नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनची किंमत मलेशियामध्ये MYR 899 म्हणजेच सुमारे 22 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनची ही किंमत 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. सनराईज ऑरेंज आणि मिडनाईट ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Honor)
नव्या डिव्हाईसच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Honor X7e मध्ये 6.61-इंच टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1604 x 720 पिक्सेलचे एचडी+ रिजाल्यूशन ऑफर करतो. हा स्मार्टफोन 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि यामध्ये डायनामिक डिमिंग सारखे आई कम्फर्ट फीचर्स देखील पाहायला मिळत आहेत.
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी81 अल्ट्रा चिपसेट देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 6GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. Honor रॅम एक्सपेंशन टेक्नोलॉजी देखील ऑफर करत आहे. ज्यामुळे गरज पडल्यास यूजर्स एक्स्ट्रा वर्चुअल मेमोरीचा वापर करू शकतात.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच फोनमध्ये एक ऑक्सिलरी सेंसर देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजेच याची बॅटरी आहे. यामध्ये 7,000mAh किंवा 7,500mAh मिळणार आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
नव्या फोनमध्ये अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10.0 मिळणार आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64-रेटिंग दिली आहे. डिव्हाईसमध्ये ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, या डिव्हाईसमध्ये 5G कनेक्टिविटी सपोर्ट मिळणार नाही.
Ans: HONOR ही चीनची स्मार्टफोन आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.
Ans: होय, HONOR स्मार्टफोन आकर्षक डिझाइन, चांगला कॅमेरा आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात.
Ans: होय, HONOR कडे विविध किंमत श्रेणींमध्ये अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.






