आतड्यांमध्ये सडलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका
आतड्यांचे आरोग्य कशामुळे बिघडते?
गट हेल्थ सुधारण्यासाठी उपाय?
फायबर युक्त पदार्थ का खावेत?
रोजच्या आहारात खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन करण्यासाठी केवळ पचनसंस्था मजबूत असून चालत नाहीतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती, मानसिक आरोग्य आणि संपूर्ण हेल्थ चांगले असणे फार आवश्यक आहे. पण बऱ्याचदा तिखट, तेलकट आणि अतिप्रमाणात जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता, आंबट ढेकर येणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. गट हेल्थ खराब झाल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. पचनसंस्था हा शरीराचा दुसरा मेंदू आहे.(फोटो सौजन्य – istock)
Male Fertility: फक्त सिगारेट-तंबाखूच नाही, ‘या’ कारणांमुळेही स्पर्म काउंट होऊ शकतो कमी
पोटात ट्रिलियन्सच्या संख्येने सूक्ष्मजीव राहतात, ज्याला गट मायक्रोबायोम असे म्हणतात. आतड्यांमधील सूक्ष्मजीव पचनक्रिया, रोगप्रतिकारशक्ती, चयापचय आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. निरोगी पोट शरीरातील आवश्यक पोषक घटक सहज शोषून घेतो. वारंवार तुमच्या पोटात दुखत नसेल किंवा ऍसिडिटीचा त्रास उद्भवत नसेल तर तुमची पचनक्रिया निरोगी आहे. आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी मल बाहेर पडून न गेल्यास जुनाट बद्धकोष्ठता किंवा अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दैनंदिन आहारात या पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. चला तर जाणून घेऊया.
पचनसंस्था निरोगी राहिल्यास नियमित पोट व्यवस्थित स्वच्छ होते. आतड्यांमधील विषारी घटक सहज बाहेर पडून गेल्यास आरोग्य सुधारू शकते. दिवसातून तीन वेळा ते आठवड्यातून तीन वेळा शौचास होणे या सवयी अतिशय सामान्य मानल्या जातात. पण कधीकधी आहारात होणाऱ्या बदलांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू लागल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जात नाही. मलमधून रक्त पडणे, पोटातील तीव्र वेदना, जुलाब होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या समस्या जास्त वेळ टिकून राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
अनेकांना रात्रीच्या वेळी खूप जास्त जेवण्याची सवय असते. पण चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थांचे सेवन केल्यास वारंवार पोट फुगणे, जास्त गॅस होणे किंवा खाल्ल्यानंतर लगेच अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, पोटात पेटके येणे, अन्नपदार्थांची ॲलर्जी, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजारांची लक्षणे असू शकतात. पचनासंबंधित लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. अन्यथा आरोग्य बिघडू शकते.
पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पोट स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही महागड्या पदार्थांचे सेवन करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आहारात थंड पदार्थांच्या सेवनासोबतच फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. तसेच नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. याशिवाय अति-प्रोसेस्ड अन्न, साखर आणि अल्कोहोलचे सेवन करणे टाळावे. सतत पोटात दुखणे, शौचातून रक्त येणे किंवा काळी विष्ठा होणे, गिळताना त्रास होणे, सतत उलट्या किंवा तीव्र पोटफुगीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
Ans: फायबरयुक्त फळे, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, दही, ताक आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश करावा.
Ans: दररोज पुरेसे पाणी प्या, फायबरयुक्त आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि शौचाची इच्छा दाबून ठेवू नका.
Ans: होय. दही, ताक आणि इतर प्रोबायोटिक पदार्थ काही लोकांमध्ये आतड्यांतील चांगल्या जीवाणूंचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात.






