गूगल क्रोमला टक्कर देण्यासाठी OpenAI सज्ज! कंपनीने लाँच केलं ChatGPT Atlas AI ब्राउजर, हे आहेत टॉप फीचर्स!
दिवाळीच्या मुहूर्तावर OpenAI ने त्यांच्या युजर्सना एक खास सरप्राईज दिलं आहे. अमेरिकी कंपनी OpenAI ने गुगल क्रोमला टक्कर देण्यासाठी त्यांचे नवीन ChatGPT Atlas ब्राउझर लाँच केले आहे. ChatGPT वर आधारित असणारे हे AI पावर्ड ब्राउझर गूगल क्रोमला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. आता हे ब्राउझर केवळ मॅकOS साठी उपलब्ध आहे आणि पुढील काळात हे ब्राउझर विंडोज, iOS आणि अँड्रॉईडसाठी देखील लाँच केले जाणार आहे. OpenAI च्या या ब्राऊझरमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, जे गूगल क्रोमला टक्कर देणार आहे. OpenAI च्या या नव्या ब्राऊझरमुळे आता गुगल क्रोमच्या अडचणी वाढणार आहेत.
Atlas ब्राउझरमध्ये यूजर्सना ब्राउजिंग करताना ChatGPT ची पूर्ण मदत मिळणार आहे. कंपनीने ब्राउजरच्या साइडबारमध्ये ChatGPT चे ऑप्शन ठेवले आहे आणि आस्क चॅटजीपीटी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन एक्टिवेट होणार आहे. ईमेल ड्राफ्ट करण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी युजर्स ChatGPT चा वापर करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Atlas मेमोरी टूलसह लाँच करण्यात आले आहे. याचा अर्थ असा आहे की, ChatGPT लक्षात ठेवणार आहे की, यूजर्सने कोणत्या वेबसाईट्सला भेट दिली होती आणि त्या वेबसाईट्सवर कोणती माहिती उपलब्ध होती. हे टूल या माहितीचा वापर करून त्याचे रिस्पॉन्स पर्सनलाइज करणार आहे. सेटिंगमध्ये जाऊन युजर्स मेमोरी फीचर एक्टिव्हेट करू शकणार आहेत.
Atlas मध्ये AI पावर्ड सर्च रिजल्ट पाहायला मिळणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, तुमची सर्च क्वेरी गूगल सर्च किंवा बिंगवर सर्च केली जाणार नाही. कंपनी यासाठी ChatGPT चा वापर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. OpenAI ने असं सांगितलं आहे की, त्यांनी Atlas साठी ChatGPT सर्च एक्सपीरियंस मोठ्या प्रमाणात इंप्रूव केला आहे.
या खास फीचरमध्ये हे ब्राऊझर आपओप युजर्सचे टास्क पूर्ण करणार आहे. कंपनीने डेमोमध्ये दाखवलं आहे की, ChatGPT एखादी रेसिपी पाहून आवश्यक असलेले सर्व साहित्य आपोआप ऑर्डर करू शकणार आहे. गुगल क्रोम सारख्या ब्राउझरवर यासाठी काही मिनिटे लागतील, परंतु Atlas चा एजंटिक मोड हे काही सेकंदात करू शकतो.
आता तुमचा प्रत्येक फोटो असणार परफेक्ट! फोटोग्राफीसाठी हे आहेत बेस्ट स्मार्टफोन, आजच करा खरेदी
Atlas ब्राउजरवर टेक्स्ट एडिटिंग करणं अगदी सोपं झालं आहे. यूजर्स ईमेलसह कोणतंही टेक्स्ट सिलेक्ट करून ChatGPT आयकॉनवर टॅप करू शकतात. या टेक्स्टची टोन किंवा त्याची लिहीण्याची पद्धत काही प्रमाणात बदलली जाणार आहे. आता कोणतीही महत्त्वाची माहिती कॉपी-पेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या टॅबमध्ये स्विच करण्याचा त्रास संपला आहे. डेमोमध्ये दिसणारे हे फीचर्स पाहून असा अंदाज वर्तवला आहे की, हे नवीन ब्राऊझर गुगल क्रोमला टक्कर देणार आहे.या नवीन ब्राऊझरच्या लाँचिंगमुळे गुगल क्रोमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.