करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर
Apple ने अलीकडेच त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजसह कंपनीने आयओएस 26 चे स्टेबल अपडेट देखील रोलआऊट केले होते. हे अपडेट रिलीज केल्यानंतर सर्वात मोठा बदल यूजर इंटरफेस (UI) मध्ये पाहायला मिळाला होता. हे अपडेट रोलआऊट करण्यात आल्यानंतर युजर्सना पहिल्यांदा Liquid Glass डिझाईन मिळाले. या नवीन डिझाईमध्ये 2D मिनिमलिस्ट स्टाइलऐवजी रिफ्लेक्शन आणि फ्लुइडिटीवर जास्त फोकस देण्यात आला होता, ज्यामुळे आयफोनचा लूक आणि युजर्सचा अनुभव अधिक चांगला झाला होता.
Realme GT 8 Pro स्मार्टफोन सिरीज लाँच! Ricoh GR Optics आणि 7000mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या फीचर्स
हे अपडेट रोल आऊट केल्यानंतर काही युजर्स आनंदी तर काही युजर्स नाराज होते. असे अनेक युजर्स होते, ज्यांना या नव्या अपडेटनंतर नोटिफिकेशन रीड करण्यात अडचणी येत होत्या. या सर्वांचा विचार करून आता कंपनीने हे फीचर कंट्रोल करण्यासाठी एक नवीन ऑप्शन सादर केलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
MacRumors ने सांगितलं आहे की, Apple ने iOS 26.1 बीटा वर्जनमध्ये Liquid Glass साठी नवीन टिंटेड थीम ऑप्शन सादर केलं आहे. म्हणजेच आता युजर्सची इच्छा असेल तर ते आधीचा क्लियर लूक देखील परत वापरू शकणार आहेत किंवा नवीन टिंटेड थीम सेलेक्ट करू शकतात. ही नवीन टिंटेड थीम UI ची ट्रांसपेरेंसी कमी करते, ज्यामुळे कंट्रोल्स आणि बटन जास्त क्लियर पाहायला मिळतात. यासोबतच हे इंटरफेसमध्ये चांगले कॉन्ट्रास्ट देखील जोडेल, ज्यामुळे दृश्यमानता आणखी चांगली होईल.
अनेक युजर्सचं असं म्हणणं होतं की, लिक्विड ग्लास डिजाइनमुळे इंटरफेसमधील अनेक भागं पाहणं कठीण झालं होतं. ऐप्पल म्यूजिक आणि दुसऱ्या अॅप्समधील नोटिफिकेशन आणि नेविगेशन कंट्रोल इत्यादीमध्ये सम्या निर्माण झाली होती. कंपनीने सांगितलं आहे की, युजर्सच्या म्हणण्यानुसार त्यांना नवीन डिझाईनसाठी ओपेक लुकची गरज आहे. यानंतर, एक नवीन अपडेट रोल आउट होत आहे जे यूजर्सना लिक्विड ग्लास पर्सनलाइज्ड करण्याची परवानगी देईल. हे नवीन वैशिष्ट्य iOS 26.1 बीटा 4 मध्ये यूजर्ससाठी रोल आउट केले जाईल.