US Iran War : इराण युद्धात अमेरिका बॅक फुटवर! १० दिवसांतच ट्रम्प यांचा सूर बदलले; सत्तापालटाचा गेम फसला? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांना त्यांच्या सल्लागारांनी इराणसोबत शांततेने संवाद साधून तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
मंगळवनारी (१० मार्च) ‘युद्ध समाप्तीचेही संकेत त्यांनी दिले आहेत. वॉल स्ट्रीट जनरलने दिलेल्या वृत्तानुसार, युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास
थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे.
शिवाय या वर्षाच्या शेवटी अमेरिकिते निवडणुका प्रस्तावित आहेत. युद्ध थांबले नाही तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील लोक नाराज होऊ शकता असा इशार त्यांच्या सल्लागारांनी दिला आहे. या युद्धातून अमेरिकेला लष्करी किंवा आर्थिक फायदा होत नसल्याचे ट्रम्प यांच्या सल्लागारांनी म्हटले आहे. यामुळेच ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपेल अशी घोषणा केली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या युद्धात अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. शिवया इराणचे अनेक वरिष्ठ कमांडरही ठार करण्यात आले होते. मात्र यानंतर इराणने शरणागती पत्करलेली नाही. शिवाय खामेनेई यांची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न देखील फसला आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून खामेनई यांच्या धाकट्या मुलाची मोजतबा खामेनेईची निवड करण्यात आली आहे. तसेच इराणची जनता देखील रस्त्यावर उतरलेली नाही. यामुळे ट्रम्प यांचा सत्तापालटाचा गेम फसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरितेने इराण युद्धात सुरुवातीच्या दनो दिवसांतच ५. ६ अब्ज डॉलर्सचा दारुगोळा वापरला होता. १० दिवसांत अमेरिकेने या युद्धावर १० अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च केला आहे. शिवाय जागतिक इंधन पुरवठा ठप्प झाल्याने देशातही इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. शिवाय देशांतील ५३% नागरिकांनी इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
एकूणच इराण युद्धामुळे अमेरिकेला कोणताही फायदा झालेला नाही, उलट देशांतर्गत ट्रम्प प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे. याशिवाय आर्थिक फटकाही बसत आहे. तसेच लष्कराचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे ट्रम्प माघार घेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Ans: इराणवरील हल्ल्यानंतर १० दिवसांत अमेरिकेला मोठा आर्थिक फटला बसला आहे. तसेच येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासन राजकीयदृष्ट्या अडचणीतही येऊ शकते यामुळे युद्ध संपण्यावसाठी ट्रम्प धडपड करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Ans: मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे ५३% अमेरिकेन नागरिकांनी इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिका इस्रायलला गरजेपेक्षा जास्त समर्थन देत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.






