विदर्भात उष्णतेची लाट (फोटो- istockphoto)
विदर्भात उष्णतेची लाट कायम
तापमानात घटण्याची शक्यता
हवामान विभागाने दिला पावसाचा इशारा
अमरावती: विदर्भासह बिहार, झारखंड व छत्तीसगड या भागावर सध्या कमी दाबाचा द्रोणीय पट्टा सक्रिय असून पश्चिम हिमालयावर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव दिसून येत आहे. या हवामान स्थितीमुळे विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या विदर्भातील कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असून किमान तापमान १९ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. भारतीय हवामाना विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात सातत्याने बदल दिसून येत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात देखील उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे शहरात देखील उष्णतेच्या झळ जाणवू लागली आहे.
Pune Weather: यंदा काय खरे नाही! पुणे आणखी तापणार; पारा थेट ३९ अंश सेल्सिअस…
‘या’ जिल्ह्यात पारा 37 अंशाच्या पुढे
मालेगाव शहर परिसरात मार्चच्या प्रारंभीच उन्हाची काहीली वाढली आहे. तापमानाचा पारा ३७.४ अंश सेल्सिअसवर नोंदवला जात आहे. दुपारच्या सत्रात रस्त्यांवरची वर्दळ ही कमी झाली आहे. उन्हापासून (Heat Wave) बचाव करण्यासाठी नागरिकांनी टोपी ,उपरणे चष्मे खरेदी कडे कल वाढवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टोपी, उपकरणे यांना काही प्रमाणात महागाईचा फटका बसला आहे. शहर- परिसरात दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात तापमान ४० ते ४५ अंश सेल्स एवढे उच्चांकी नोंदवले जाते. गेल्या तीन वर्षांपासून उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे.
हाय गर्मी! यंदा उन्हाळा म्हणजे जाळ अन् धूरच…; ‘या’ जिल्ह्यात पारा 37 अंशाच्या पुढे, मे महिन्यात तर…
सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. मार्च महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहर- परिसरातील नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी ,उपरणे, चष्मा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. शहरातील किदवाई रस्ता, कॅम्प रस्ता , सटाणा रस्ता तसेच विविध चौकात हातगाडीवर टोपी विक्रीची दुकाने थाटले आहेत. टोपीच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के व उपरण्यामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथे टोपी विक्रीचा माल मुंबईहून येतो . येथील किदवाई रस्त्यावरील दुकानांमध्ये फॅशनच्या टोपीला वर्षभर मागणी असते .
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी दुकानांमध्ये मालाची साठवणूक केली आहे. उपरण्याचा माल तामिळनाडू मधून येत असतो. शहरातील उपरणे व इतर माल सटाणा ,कळवण, देवळा, नांदगाव ,चांदवड, यासह जिल्ह्यात विक्रीला जातो. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वस्तूंना चांगली मागणी असल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले.






