UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित
सध्याच्या काळात UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकं अगदी छोट्या खरेदीपासून मोठ्या शॉपिंगपर्यंत सर्वासाठी ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहे. ऑनलाईन पेमेंटचे बरेच फायदे आहेत. या फायद्यांसोबतच काही तोटे देखील आहेत. ऑनलाईन पेमेंटच्या वाढत्या वापरासोबतच फ्रॉडच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच सर्वांचा विचार करून युजर्सच्या सुरक्षेसाठी भारतीय रिजर्व बँक म्हणजेच RBI ने नवीन UPI सुरक्षा गाइडलाइन जारी केली आहे. RBI ने 5 महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, या नियमांचे पालन केल्यास तुमचे बँक अकाऊंट आणि डिजिटल पेमेंट 100 टक्के सुरक्षित राहणार आहे. चला तर मग RBI च्या या नव्या नियमांबद्दल जाणून घेऊया.
RBI ने नवीन UPI सुरक्षा गाईडलाईनमध्ये सांगितलं आहे की, फिशिंग लिंक आणि नकली QR कोड UPI फ्रॉडचे सर्वात जुने मार्ग आहेत. कधीकधी रिफंड किंवा कॅशबॅकच्या नावाखाली स्कॅमर्स युजर्सना लिंक किंवा QR कोड पाठवतात. युजर्सनी या लिंकवर क्लिक करताच किंवा QR कोड स्कॅन करताच युजर्सचे बँक डिटेल्स चोरी होतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्कॅमर्स स्वत:ला बँक अधिकारी किंवा पेमेंट अॅपचा एजंट असल्याचे सांगत युजर्सकडून UPI पिन किंवा ओटीपीची मागणी करतात. मात्र RBI ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, कोणतीही कायदेशीर संस्था कधीही यूजरला OTP, पिन किंवा पासवर्ड शेअर करण्यास सांगत नाही.
RBI ने सांगितलं आहे की, फेक UPI अॅप आणि वेबसाइट्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे UPI अॅप आणि वेबसाइट्स अगदी खऱ्याप्रमाणे दिसतात. अशा फेक UPI अॅप आणि वेबसाइट्सवर क्लिक करताच तुमची माहिती हॅकर्सकडे पोहोचते. त्यामुळे कोणतेही अॅप डाऊनलोड करताना डेवलपरचे नाव तपासा.
RBI ने UPI सुरक्षा गाईडलाइनमध्ये सांगितलं आहे की, कोणत्याही व्यक्तीला पेमेंट करण्यापूर्वी त्याचे नाव, मोबाईल नंबर किंवा UPI ID काळजीपूर्वक तपासा. अनेक स्कॅमर्स खोट्या नावाने अकाऊंट तयार करतात, जे एखाद्या मोठ्या ब्रँडच्या नावाप्रमाणे दिसतं. अशा परिस्थितीत, पैसे देताना, ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे पाठवत आहात त्याचे नाव देखील तपासा.
जर तुम्हील एखाद्या UPI फ्रॉडचे शिकार झाला असाल तर कोणतीही वाट न बघता सर्वात आधी तक्रार करा. RBI ने सांगितलं आहे की, 24 तासांच्या आत यूजरची तक्रार नोंदवा. यासाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवेशी तात्काळ संपर्क साधू शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही 1930 (नॅशनल सायबर हेल्पलाइन) वर कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.
UPI म्हणजे काय?
UPI (Unified Payments Interface) ही एक डिजिटल पेमेंट प्रणाली आहे, जी बँक खात्यांदरम्यान त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते.
UPI वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?
तुमच्याकडे स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन, बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे.
कोणती अॅप्स UPI सपोर्ट करतात?
फोनपे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, भीम, क्रेड आणि इतर अनेक अॅप्स UPI सेवा देतात.
UPI PIN म्हणजे काय?
UPI PIN हा 4 किंवा 6 अंकी गुप्त कोड असतो, जो प्रत्येक ट्रान्सफरवेळी पेमेंट कन्फर्म करण्यासाठी लागतो.






