स्मार्टफोन की मॅजिक? Realme P3 Pro मध्ये मिळणार खास डिझाईन, क्षणातच अंधार होणार छूमंतर!
तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता स्मार्टफोन कंपनी Realme एक ब्रँडन्यू डिझाईनसह स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन नॉर्मल स्मार्टफोनप्रमाणे नसून यात अंधारात चमकण्याची एक अनोखी पॉवर आहे. एखाद्या लाईटप्रमाणे हा स्मार्टफोन अंधारात चमकू लागेल, जे पाहून तुमच्यासह इतरांचे देखील डोळे दिपणार आहे. अंधारात चमकणारा असा पहिला स्मार्टफोन आता Realme लाँच करणार आहे. Realme P3 Pro या नावाने हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.
हातांची गरज नाही, आता डोळ्यांच्या इशाऱ्यावर काम करेल तुमचा iPhone! जबरदस्त आहे हे फीचर
बऱ्याचदा असं होतं की अंधार असेल आणि तुम्ही तुमचा स्मार्टफोन एखाद्या ठिकाणी ठेवला असेल तर तो शोधण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो. पण आता असं होणार नाही. कारण Realme P3 Pro स्मार्टफोन त्याच्या अनोख्या डिझाईनमुळे अंधारात देखील अगदी सहज शोधला जाऊ शकतो. खरं तर Realme P3 Pro स्मार्टफोन अंधार दूर करू शकतो, असं म्हटलं तरी हरकत नाही. या स्मार्टफोनची लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme P3 Pro भारतात 18 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. आगामी हँडसेटच्या अनेक प्रमुख वैशिष्ट्यांची पुष्टी झाली आहे. स्मार्टफोनचा टिझर देखील सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये असे म्हटले आहे की हा फोन जीटी बूस्ट गेमिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल आणि तो ‘ऑप्टिमाइझ्ड बीजीएमआय (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया) परफॉर्मन्स’ देईल. आता, कंपनीने अशी माहिती दिली आहे की हा हँडसेट ‘ग्लो इन द डार्क डिझाइन’ सह येईल. म्हणजेच हा स्मार्टफोन अंधारात चमकेल. या स्मार्टफोनचे रंग पर्याय देखील उघड झाले आहेत.
कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे की, Realme P3 Pro ‘नेब्युला डिझाइन’सह येईल ज्यामध्ये सेल्युलॉइड टेक्सचर असेल. हे ‘ल्यूमिनस कलर-चेंजिंग फाइबर’ ने सुसज्ज आहे जे प्रकाश शोषून घेतात आणि अंधारात चमकतात. वापरकर्त्यांची पकड सुधारण्यासाठी यात ’42-डिग्री गोल्ड कर्वेचर’ असल्याचा दावा देखील केला जातो.
Watch your best moves glow with the #realmeP3Pro5G, #BornToSlay with its glow-in-the-dark design & stunning quad-curved display.
Launching Feb 18 on @Flipkart!
Know More:https://t.co/p9FT51EBa0https://t.co/fTFutAUyxU
— realme (@realmeIndia) February 12, 2025
Realme P3 Pro देशात तीन खास रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ज्यामध्ये गॅलेक्सी पर्पल, नेब्युला ग्लो आणि सॅटर्न ब्राउन यांचा समावेश असणार आहे. फोनच्या अधिकृत लँडिंग पेजवरील टीझरमध्ये दावा केला आहे की आगामी हँडसेटला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP66+IP68+IP69 रेटिंग मिळालं आहे. यात 7.99mm थिन प्रोफाइल देखील असेल.
Realme ने यापूर्वी पुष्टी केली होती की P3 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी असेल जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. यात क्वाड-कर्व्ह डिस्प्ले असेल आणि त्यात एरोस्पेस ग्रेड व्हीसी कूलिंग सिस्टम असल्याचा दावा केला जातो.
कंपनीने क्राफ्टनसोबत GT Boost गेमिंग तंत्रज्ञान को-डेवलप केले आहे. Realme P3 Pro मध्ये हे फीचर असेल. AI अल्ट्रा-स्टेडी फ्रेम्स, हायपर रिस्पॉन्स इंजिन आणि एआय अल्ट्रा टच कंट्रोल सारख्या वैशिष्ट्यांसह, हा BGMI गेमप्लेसाठी सर्वोत्तम स्मार्टफोनपैकी एक असल्याचा दावा केला जातो. हा हँडसेट देशात रिअलमी ई-स्टोअर तसेच फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.