BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर
बीएसएनएल एक नवीन स्पार्क फायबर प्लॅन लाँच केला आहे. या नवीन प्लॅनअंतर्गत कंपनी त्यांच्या फायबर ब्रॉडबँड यूजर्सना 399 रुपयांचे मंथली चार्ज आकारून 50Mbps च्या वेगाने 3,300GB हाय-स्पीड डेटा देत आहे. हाय-स्पीड इंटरनेटसोबतच कंपनी त्यांच्या यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील देत आहे. म्हणजेच 400 रुपयांहून कमी किंमतीत बीएसएनएल यूजर्सना दर महिन्याला 3300 जीबी डेटा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्पार्क प्लॅनअंतर्गत ही ऑफर केवळ पहिल्या 12 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. 13 व्या महिन्यापासून, म्हणजेच प्लॅन खरेदी केल्याच्या एक वर्षानंतर, यूजर्सना या प्लॅनसाठी दरमहा 449 रुपये खर्च करावे लागतील. तसं तर या प्लॅनमध्ये कोणतेही ओटीटी फायदे ऑफर केले जात नाहीत. घरातील वापरासाठी फायदेशीर ठरणारा असा हा एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आहे. अनलिमिटेड कॉलिंगसह हाय-स्पीड डेटाचे फायदे देणारा हा प्लॅन सामान्य वापरासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.
बीएसएनएल फायबर ऑफरचा फायदा घेण्यासाठी यूजर्सना बीएसएनएलच्या ऑफिशियल व्हॉट्सअॅप नंबर 1800 4444 वर ‘HI’ लिहून मेसेज पाठवून प्लॅन अॅक्टिव्हेट करावा लागणार आहे. यानंतर यूजर्स कंपनीच्या या नवीन रिचार्ज प्लॅनचे फायदे अनुभवू शकणार आहेत.
Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट
बीएसएनएलने त्यांच्या सुपरस्टार प्रीमियम वाय-फाय प्लॅनच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनी या प्लॅन्सच्या खरेदीवर यूजर्सना सुमारे 20 टक्के डिस्काऊंट ऑफर करत आहे. या फेस्टिव सीजनमध्ये बीएसएनएलच्या 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन तुम्हाला केवळ 799 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या खास ऑफरद्वारे, ही योजना 12 महिन्यांसाठी म्हणजेच एक वर्षासाठी आहे. सुपरस्टार प्रीमियम वाय-फाय प्लॅनमध्ये अपग्रेड करण्यासाठी 12 महिन्यांचे अॅडव्हांस पेमेंट करावे लागणार आहे आणि हा वायफाय तुम्हाला 799 रुपयांत मिशळणार आहे. यामध्ये 5000 जीबी डेटा प्रत्येक महिन्याला मिळणार आहे आणि याची स्पीड 200 Mbps म्हणजेच अल्ट्रा-फास्ट इंटरनेटवाली असणार आहे.






