150 हून स्पोर्ट्स मोड आणि अनोखे हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स... नवी Redmi स्मार्टवॉच लाँच, किंमत केवळ इतकी
पोलंड, रोमानिया आणि थायलंडमध्ये रेडमी वॉच 6 च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. तर या स्मार्टवॉचचे एनएफसी-इनेबल्ड व्हेरिअंट आता केवळ पोलंडमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. रेडमी वॉच 6 पोलंडमध्ये PLN 449 म्हणजेच सुमारे 10 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. तर रेडमी वॉच 6 एनएफसीची किंमत PLN 499 म्हणजेच सुमारे 11 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टवॉचच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, रेडमीच्या या स्मार्टवॉचमध्ये 2.07-इंच अमोलेड स्क्रीन दिली आहे. यासोबतच या वॉचमध्ये 60Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 2,000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये 2.5D कर्व्ड ग्लास कवर आणि पातळ बेजल आहेत. हा डिस्प्ले ‘ऑलवेज-ऑन’ फंक्शनलिटी आणि कस्टमाइजेबल वॉच फेससह लाँच करण्यात आले आहे.
रेडमीने लाँच केलेल्या या स्मार्टवॉचमध्ये 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. त्यापैकी 6 अॅक्टिव्हिटी आपोआप ओळखू शकते. हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्लीप एनालिसिस आणि स्ट्रेस मॉनिटरिंग देखील मिळणार आहे. या वॉचमध्ये एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, जियोमॅग्नेटिक सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर आणि पाण्याखालीही हार्ट रेटची तपसाणी करण्याची सुविधा असलेला ऑप्टिकल हार्ट रेट सेंसर देण्यात आला आहे.
Free Fire MAX: लो स्टोरेज फोनमध्येही स्मूथ चालेल गेम! या सोप्या टिप्स एकदा वापरून तर पाहा
रेडमी स्मार्टवॉचमध्ये 5ATM वॉटर रेजिस्टेंस रेटिंग देण्यात आली आहे. यामध्ये 550mAh बॅटरी दिली आहे. जी सामान्य वापरासाठी 12 दिवसांपर्यंत आणि बॅटरी सेव्हर मोडमध्ये 24 दिवसांपर्यंत चालते. नेव्हिगेशनसाठी, स्मार्टवॉचमध्ये ड्युअल L1 जीएनएसएस अँटेना आहेत, जे जीपीएस, बेईडू, ग्लोनास, गॅलीलियो आण क्यूजेडएसएस प्रणालींना सपोर्ट करतात.






