आता कॅप्चर करा प्रत्येक क्षण! नव्या Vivo स्मार्टफोनने हादरलं मार्केट, दमदार कॅमेऱ्याने प्रतिस्पर्ध्यांना फुटला घाम
भारतात वीवो एक्स 300 अल्ट्रा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत 1,59,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन एक्लिप्स ब्लॅक आणि विक्ट्री ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. विवो झाईस टेलीफोटो एक्सटेंडर जेन 2 अल्ट्रा (400mm इक्विवेलेंट) ची किंमत 27,999 रुपये आहे, तर विवो इमेजिंग ग्रिप किटची किंमत 11,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Vivo)
लाँच ऑफर अंतर्गत, ग्राहक वीवो एक्स 300 अल्ट्रा, टेलीफोटो एक्सटेंडर जेन 2 अल्ट्रा आणि इमेजिंग ग्रिप किट यांचा एकत्रित बंडल त्याच्या मूळ किंमत (MOP) 1,99,997 रुपयांऐवजी 1,95,997 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. विवोने एक्स 300 अल्ट्रा फोटोग्राफर किट देखील सादर केले आहे. यामध्ये वर नमूद केलेल्या ॲक्सेसरीजसोबतच 200 मिमी इक्विवेलेंट अतिरिक्त टेलीफोटो एक्सटेंडर लेन्सचा समावेश आहे. याची किंमत 2,09,999 रुपये आहे. ग्राहकांना कार्डने व्यवहार केल्यास 10 टक्क्यांचे इंस्टंट कॅशबॅक एक वर्षाच्या मोफत एक्सटेंडेड वॉरंटीची फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. स्मार्टफोन सध्या विवो.कॉम, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. ग्राहक 14 मे पासून हा स्मार्टफोन अॅमेझॉन, क्रोमा, फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्सवरून खरेदी करू शकणार आहेत.
डुअल-सिम असलेला वीवो एक्स 300 अल्ट्रा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिनओएस 6 वर चालतो. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 300Hz टच सँपलिंग, 94.49 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि एचडीआर सपोर्टसह 6.82-इंच 2K (1,440 x 3,168 पिक्सेल) अमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. हँडसेट क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्याला अॅड्रेनो 840 जीपीयू आणि विवोच्या VS1+ इमेजिंग चिपसह जोडण्यात आले आहे. यात 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज मिळते.
वीवो एक्स 300 अल्ट्रामध्ये Zeiss-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 3.7x ऑप्टिकल झूम आणि 105x डिजिटल झूमवाला 200-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो सेंसर आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस समाविष्ट आहे. स्मार्टफोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
वीवो एक्स 300 अल्ट्रामध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स दिले आहेत. डिव्हाईसमध्ये 100W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,600mAh बॅटरी दिली आहे.






