Vi ने लाँच केला नवीन गॅरंटी प्रोग्राम, या ग्राहकांना मिळणार अॅडिशनल व्हॅलिडीटी
भारतातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Vi (Vodafone Idea) ने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन Vi गॅरंटी प्रोग्राम लांँच केला आहे. याबाबत कंपनीने मंगळवारी घोषणा केली असून हा प्रोग्राम 2G हँडसेट ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे.
कंपनीने लाँच केलेला प्रोग्राम 199 रुपये आणि 209 रुपये किंमतीच्या Vi प्रीपेड पॅक्सवर लागू होतो. Vi चे हे प्रीपेड प्लॅन्स 2GB डेटा आणि 300 SMS ऑफर करते. 4G आणि 5G यूजर्ससाठी गेल्या वर्षी Vi गॅरंटी प्रोग्रामची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वच युजर्सना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या Vi गॅरंटी प्रोग्रामबाबत अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Vi चा नवीन Vi गॅरंटी प्रोग्रामअंतर्गत 199 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या प्रत्येक अनलिमिटेड व्हॉईस रीचार्जवर दोन अॅडिशनल व्हॅलिडीटी दिवस ऑफर केले जाणार आहेत. त्यामुळे 12 महिन्यात हा प्रोग्राम 24 बोनस दिवस ऑफर करत आहे. Vi चं असं म्हणणं आहे की, या नवीन उपक्रमामुळे प्रत्येक पॅकसाठी नियमित 28 दिवसांऐवजी पूर्ण 30 दिवसांची सेवा सुनिश्चित होते, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता कमी होते. युजर्सच्या पैशांची देखील बचत होते. आता कंपनीने लाँच केलेल्या हा प्रोग्राम युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, यात काही शंकाच नाही.
लेटेस्ट Vi गॅरंटी बेनिफिट अशा प्रीपेड ग्राहकांसाठी लागू केले जाणार आहे, जे 2G हँडसेटचा वापर करतात आणि 199 रुपये आणि 209 रुपयांच्या अनलिमिटेड व्हॉईस रीचार्ज पॅक्सचा लाभ घेतात.199 रुपयांचा प्लॅन अनलिमिटेड कॉल्स, 2GB डेटा आणि 300 SMS ऑफर करतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. तर, 209 रुपयांचा प्लॅन अनलिमिटेड कॉल्स, 2GB डेटा, 300 SMS आणि कॉलर ट्यून ऑफर करतात.
आसाम, ईशान्य, ओडिशा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि राजस्थानमध्ये, युजर्सना 199 रुपये आणि 209 रुपयांच्या प्लॅनसह अनलिमिटेड कॉल्स व्यतिरिक्त 3GB डेटा आणि 300 SMS ऑफर केले जातात. याशिवाय 209 रुपयांचा प्लॅन कॉलर ट्यून्स बेनिफिट देखील देतो. Vi ग्राहक *999# डायल करून किंवा 1212 वर कॉल करून Vi गॅरंटी बेनिफिट अॅक्टिवेट करू शकतात. Vi अॅपद्वारे अॅडिशनल डेटा क्लेम केला जाऊ शकतो.
कंपनीने गेल्या वर्षी 4G आणि 5G ग्राहकांसाठी गॅरंटी प्रोग्राम लाँच केला होता. या प्रोग्राममध्ये एका वर्षात एकूण 130GB अतिरिक्त डेटा मोफत मिळतो. 2G यूजर्ससाठी Vi गॅरंटी प्रोग्राम हा Vi च्या अलिकडच्या 5G विस्तारानंतर आला आहे, जो भारतातील 23 शहरांमध्ये झाला होता. Vi चे 5G नेटवर्क आधीच बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पटना आणि चंदीगड सारख्या प्रमुख केंद्रांमध्ये लाइव्ह आहे.