Oppo ने उडवली सर्वांची झोप! 10,000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 8GB+128GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB या व्हेरिअंटची किंमत 2,199 युआन म्हणजेच सुमारे 31 हजार रुपये, 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 2,699 युआन म्हणजेच सुमारे 38 हजार रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 2,999 युआन म्हणजेच सुमारे 42 हजार रुपये आहे. फोन सध्या चीनमध्ये उपलब्ध आहे. कंपनी हा स्मार्टफोन भारतात Oppo F35 Pro या नावाने लाँच करण्याची शक्यता आहे. ग्राहक वेव राइडर, ऑरेंज ग्लो आणि माउंटेन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Oppo)
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, ओप्पो ए7 प्रो मॅक्स हा पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये नवीन स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो टीएसएमसीच्या 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर सीपीयू आहे, ज्यामध्ये दोन Cortex-A78 कोर 2.4GHz पर्यंत स्पीड आणि सहा Cortex-A55 कोर 2.0GHz पर्यंत स्पीड ऑफर करतात. या डिव्हाईसमध्ये अॅड्रेनो जी629 जीपीयू देखील दिला आहे. हा हँडसेट एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे.
डिव्हाईसच्या समोरील बाजूला 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन 120Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 10-बिट कलर आणि 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेससह लाँच करण्यात आला आहे. हा फोन विशिष्ट गेमिंग परिस्थितींसाठी ३३०Hz टच सॅम्पलिंग रेटलाही सपोर्ट करतो.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर मागील बाजूला यामध्ये ओआयएस सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम सेंसर, एक नोटिफिकेशन एलईडी आणि एक एलईडी फ्लॅश देण्यात आले आहे.
फोनची सर्वात मोठी खासियत त्याची 10,000mAh ची ‘ग्लेशियर बॅटरी’ आहे, ज्यामध्ये ओप्पोची स्फेरिकल सिलिकॉन-कार्बन बॅटरी टेक्नोलॉजी पाहायला मिळत आहे. डिव्हाईसमध्ये 80W सुपरवुक फास्ट चार्जिंग, 80W यूएफसीएस चार्जिंग आणि 27W रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळणार आहे.






