काउंटडाउन सुरू... या दिवशी भारतात लाँच होणार Fire-Boltt चा पहिला स्मार्टफोन! Flipkart वर झाली घोषणा
फ्लिपकार्टवर शेअर करण्यात आलेल्या मायक्रोसाईटवरून अशी माहिती मिळाली आहे की, कंपनीचा पहिला Boltt स्मार्टफोन 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. लिस्टिंगमध्ये दावा करण्यात आला आहे की, हे हँडसेट कमीत कमी डिस्ट्रेक्शन आणि स्मूद डेली-टू-डे ऑपरेशनवर फोकस करण्यासाठी क्लीन सॉफ्टवेयर अनुभव देणार आहे. प्रमोशनल पेजवर Boltt फोनच्या फ्रंच डिझाईनचा अर्ली लुक दिसत आहे. डिस्प्लेच्या मध्यभागी सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट दिला आहे. खालील बेजल इतर बाजूंच्या तुलनेत थोडा जाड दिसत आहे. फोनच्या उजव्या कडेला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कीज आहेत, आणि त्याची फ्रेम सपाट डिझाइनची असून ती ब्राउन रंगात फिनिश केलेली दिसते. (फोटो सौजन्य: Flipkart)
कंपनीने अद्याप त्यांच्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केलेला नाही. काही जुन्या रिपोर्ट्समध्ये असे संकेत मिळत आहेत की, कंपनीचा पहिला स्मार्टफोन बजेट फ्रेंडली प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला जाणार आहे. कंपनी त्यांचा पहिला स्मार्टफोन 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच करण्यावर अधिक भर देत आहे.
जर कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन या किंमतीत लाँच केला तर त्यांची थेट स्पर्धा एचएमडी, लावा, सँमसंग, वनप्लस, ओप्पो आणि वीवोसारख्या ब्रँड्ससोबत केली जाऊ शकते. फायरबोल्टने यापूर्वी घोषणा केली होती की, त्यांच्या स्मार्टफोन लाईनअपमध्ये Evo आणि Ace सीरीज समाविष्ट आहे, ज्यामध्ये भारतीय बाजारांसाठी 4G आणि 5G असे दोन्ही मॉडेल्स तयार केले जात आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, हे स्मार्टफोन्स भारतातच मॅन्युफॅक्चर केले जात आहेत.
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, कंपनीचा पहिल्या स्मार्टफोन Boltt Evo 4G या नावाने लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेन्चवर देखील पाहायला मिळाला आहे. बेंचमार्क लिस्टिंगकडून असे संकेत मिळत आहेत की, या डिव्हाईसमध्ये 4GB रॅम आणि अँड्रॉईड 16 सह यूनिसोक T7250 चिपसेट दिला जाऊ शकतो.






