लाँचिंगपूर्वीच लीक झाले Samsung Galaxy Z Fold 7 चे फीचर्स, मोठा डिस्प्ले आणि One UI 8 ने असणार सुसज्ज
आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली Samsung सध्या त्यांच्या आगामी स्मार्टफोनच्या लॉचिंगची तयारी करत आहे. Samsung लवकरच त्यांचा नवीन फोल्ड स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy Z Fold 7 या नावाने लाँच केला जाणार आहे. आगामी स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र अस सांगितलं जात आहे की, हा आगामी स्मार्टफोन याच महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. लॉचिंगपूर्वी स्मार्टफोनचे काही फिचर्स देखील लीक झाले आहेत. ज्यामध्ये मोठा डिस्प्ले आणि One UI8 अपडेट असणार आहे, असं लिक्समधे सांगण्यात आलं आहे.
Samsung Galaxy Z Fold 7 हा स्मार्टफोन येत्या काहीं दिवसांत लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy Z Fold 6 मॉडेलपेक्षा अपग्रेड असणार आहे. स्मार्टफोनची डिटेल्स लाँच पूर्वीच लीक झाली आहे. हा एक बुक-स्टाइलवाला नवा फोल्डेबल फोन असणार आहे, जो अँड्रॉइड 16 सह येतो. यामध्ये सॅमसंग One UI 8 स्किन असणार आहे. जानेवारीमध्ये लाँच करण्यात आलेल्या Galaxy S25 सीरीजप्रमाणेच, सॅमसंग Galaxy Z Fold 7 स्मार्टफोन कस्टम Snapdragon 8 Elite ने सुसज्ज असणार आहे. Samsung Galaxy Z Fold 7 चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स लॉचिंगपूर्वी समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
The 2025 Galaxy Z series will be one of the first phones released with Android 16 (One UI 8) out of the box
The lineup launches in 3 months pic.twitter.com/irBRR3wXDJ
— Anthony (@TheGalox_) April 12, 2025
सॅमसंग Samsung Galaxy Z Fold 7 ची डिटेल एक्स यूजर एंथनी (@TheGalox_) ने त्यांच्या अकाउंटवर शेअर केली आहे. याने दावा केला आहे की, हँडसेटवर एक नवीन 200-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या Samsung Galaxy Z Fold 6 मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये अपग्रेडेड अंडर डिस्प्ले कॅमेरा असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Samsung Galaxy Z Fold 7 मध्ये 8 इंचाची आतील स्क्रीन किंवा 6.5 इंचाचा कव्हर डिस्प्ले असू शकतो, जो गॅलेक्सी झेड फोल्ड 6 मध्ये वापरल्या जाणाऱ्या 7.6 इंचाच्या आणि 6.3 इंचाच्या पॅनल्सपेक्षा मोठा असेल. टिपस्टरच्या मते, आगामी स्मार्टफोनमध्ये ‘नवीन लेयर्स’ असलेला अधिक टिकाऊ डिस्प्ले आणि आतील स्क्रीनवर एक लहान क्रीज असेल. Samsung Galaxy Z Fold 7 उघडल्यावर 4.5mm जाड असल्याचे म्हटले जाते, याचा अर्थ तो त्याच्या आधीच्यापेक्षा सुमारे 1.1 मिमी पातळ असू शकतो. असा दावा आहे की हँडसेट सुधारित धूळ आणि पाण्याचा प्रतिकार देईल.
Samsung Galaxy Z Fold 7 मध्ये Galaxy S25 सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये आलेला तोच कस्टम Snapdragon 8 Elite प्रोसेसर असेल. चांगल्या थर्मल मॅनेजमेंटसाठी एक मोठा वेपर चेंबर देखील असेल. हा हँडसेट अपग्रेडेड स्पीकर्स आणि नवीन व्हायब्रेशन मोटरने सुसज्ज असल्याचे म्हटले जाते.