Tech Tips: तुमच्या Smartphone चं कव्हर देखील वारंवार पिवळं पडतंय? या सोप्या Tricks वापरा आणि वाचवा तुमचे पैसे
स्मार्टफोन युजर्स त्यांच्या फोनसाठी सहसा ट्रांसपरंट कव्हर खरेदी करतात. अशा कव्हरमुळे स्मार्टफोन नवीन दिसतो आणि एक कूल लूक देखील मिळतो. पण काही काळानंतर हे कव्हर पिवळं पडतं आणि खराब दिसू लागतं. यामुळे तुमचा नवीन फोन जुन्यासारखा दिसू लागतो. कव्हर पिवळ पडल्यामुळे आपल्याला वारंवार नवीन कव्हर खरेदी करावं लागतं. तुम्ही देखील सतत कव्हर पिवळं पडण्याच्या समस्येने वैतागले असाल, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. या टिप्सच्या मदतीने तुमचं कव्हर अगदी नव्या सारखं राहणार आहे.
नवीन स्मार्टफोनसाठी एक चमकतं ट्रांसपरंट कव्हर युजर्सची पहिली पसंत असते. मात्र काही दिवसांतच हे कव्हर पिवळ पडू लागतं आणि खराब दिसतं, ज्यामुळे फोनचा लूक देखील खराब होतो. अशा परिस्थितीत लोक वैतगातात आणि कव्हर बदलतात. फोन कव्हरचा पिवळेपणा दूर करण्याचे काही सोपे मार्ग तुम्ही फॉलो करू शकता. यामुळे तुमचे पैसे देखील वाचतील आणि तुम्हाला नवीन कव्हर देखील खरेदी करावं लागणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमचं ट्रांसपरंट फोन कव्हर उन्हापासून दूर ठेवा. सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे तुमच्या मोबाईलचे कव्हर पिवळे पडते आणि खराब होते. सूर्याची किरण प्लास्टिक आणि TPU सोबत रिएक्ट करून मोबाईल केस रंगहीन आणि पिवळा बनवते. तुमचा स्मार्टफोन खिडकीजवळ, कार डॅशबोर्ड किंवा अशा ठिकाणी ठेऊ नका जिथे सूर्याची किरणं थेट येत असतील. जर तुम्ही सतत ऊन्हात जात असाल तर स्मार्टफोनचा वापर करू नका यामुळे फोनचं कव्हर खराब होऊ शकतं.
उच्च तापमानामुळे देखील कव्हर खराब होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. उच्च तापमानामुळे सूर्यप्रकाशासारखी रासायनिक प्रतिक्रिया देखील होते ज्यामुळे कव्हर हळूहळू खराब होऊ लागते. चार्जिंग करताना फोन हीटरजवळ, गरम कारजवळ किंवा उशाखाली ठेवू नका. यामुळे फोन गरम होतो आणि उष्णता निर्माण होते. मोबाईल नेहमी थंड आणि हवेशीर ठिकाणी चार्ज करा. यामुळे तुमचा फोन आणि त्याचे कव्हर दोन्ही सुरक्षित राहतील.
तुमचा फोन तेलकट किंवा तेलकट हातांनी धरू नका कारण यामुळे कव्हर खराब होऊ शकते. तेलकट त्वचा, घाम, लोशन किंवा जेवतानाचे हात कव्हरला लावल्यास कव्हर खराब होऊ शकते. जर तुम्हाला बराच काळ मोबाईल वापरायचा असेल तर तुमचे हात चांगले धुवा आणि पुसून टाका, विशेषतः काहीही खाताना काळजी घ्या.
तुमच्या स्मार्टफोनचे केस किंवा कव्हर आठवड्यातून एकदा कोमट पाणी आणि साबणाने धुवा. डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही मऊ ब्रश किंवा बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. स्मार्टफोनचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर करू नका. जर तुमच्याकडे जास्त फोन केस असतील तर ते आलटून पालटून वापरा. जास्त वापरामुळे एकच कव्हर खराब होणार नाही आणि जास्त काळ टिकेल.