म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स
Spotify ने भारतात नवीन प्रिमियम प्लॅन्स लाँच केले आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता देशात Spotify चे एकूण चार पेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्समध्ये लाईट, स्टँडर्ड, स्टुडंट आणि प्लॅटिनम प्लॅन्सचा समावेश आहे. ज्यामधील सर्वात स्वस्त प्लॅन Lite आहे. तसेच प्लॅटिनम प्लॅनमध्ये अनेक AI-पावर्ड फीचर्स ऑफर केले जाणार आहेत. जसे AI DJ आणि AI Playlist Creation. कंपनीचे हे चारही प्लॅन युजर्सना एड-फ्री म्यूजिक स्ट्रीमिंग ऑफर करतात. याशिवाय कंपनीने Audiobooks Recaps नावाचे एक फीचर देखील लाँच केले आहे, जे युजर्सना त्यांनी आधी ऐकलेल्या ऑडियोबुक पार्ट्सची AI-समरी देते.
म्यूजिक स्ट्रीमिंग सर्विस Spotify ने भारतात एक नवीन प्रीमियम प्लॅन सुरु केला आहे. ज्यामुळे आता भारतातील एकूण पेड प्लॅन्सची संख्या चार झाली आहे. सर्वात स्वस्त Spotify प्रिमियम लाईटची किंमत 139 रुपये प्रति महिना आहे. हा प्लॅन 160 kbps पर्यंत ‘हाय ऑडिओ क्वालिटी’ आणि एड-फ्री एक्सपीरियंस ऑफर करतो. हा प्लॅन केवळ एका अकाऊंटसाठी उपलब्ध आहे. यासोबतच Spotify Premium Standard प्लॅनमध्ये देखील यूजर्स जाहिरातींशिवाय म्युझिक आणि ऑडियोबुक्स ऐकू शकणार आहेत. कंपनीच्या या प्लॅनची किंमत 199 रुपये प्रति महिना आहे. मात्र सुरुवातीला यूजर्स दोन महिन्यांचे सब्सक्रिप्शन याच किंमतीत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Spotify Premium Standard प्लॅन देखील केवळ एकाच अकाऊंटसाठी उपलब्ध आहे. फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर एड-फ्री म्यूजिक प्लेबॅकव्यतिरिक्त सब्सक्राइबर्स म्यूझिक आणि ऑडियोबुक्स डाउनलोड करून ऑफलाइन ऐकू शकणार आहेत. या प्लॅनमध्ये 320 kbps पर्यंत ‘व्हेरी हाय’ ऑडियो क्वालिटी मिळणार आहे. Spotify Student Premium प्लॅन केवळ अशा युजर्ससाठी उपलब्ध आहे, जे कोणत्याही ‘एलिजिबल एक्रिडेटेड’ हायर एजुकेशन इंस्टिट्यूशनमध्ये एनरोल्ड आहेत. याचे व्हेरिफिकेशन केले जाते.
Spotify Premium Student प्लॅनची किंमत पहिल्या दोन महिन्यांसाठी 99 रुपये आहे आणि त्यानंतर 99 रुपये प्रति महिना असणार आहे. यातील सर्वात महाग प्लॅन Spotify Premium Platinum आहे. ज्याची किंमत 299 रुपये प्रति महिना आहे. यामध्ये तीन युजर अकाऊंट वापरले जाऊ शकतात, ऑडियो फाइल डाउनलोड करू शकता आणि यामध्ये 44.1kHz पर्यंत ‘lossless’ ऑडियो क्वालिटी मिळते. Platinum प्लॅनमध्ये तुमच्या प्लेलिस्ट मिक्स करा, एआय डीजे आणि एआय प्लेलिस्ट निर्मिती सारखे फीचर्स मिळतात आणि DJ सॉफ्टवेयर अॅपद्वारे कनेक्ट करण्याचा ऑप्शन देखील मिळतो.
Spotify ने ऑडियोबुक ऐकणाऱ्या लोकांसाठी Audiobooks Recaps नावाच्या फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर सध्या बीटामध्ये आहे आणि सध्या iOS वर मर्यादित संख्येतील इंग्रजी ऑडिओबुकसाठी उपलब्ध आहे. हे एक नवीन Recap बटन जोडते, जे युजर्सनात त्यांनी आधी ऐकलेल्या गाण्यांचा भागांची AI-जनरेटेड समरी ऐकण्याची परवानगी देतो.
Ans: होय. मोफत व्हर्जन उपलब्ध आहे, पण त्यात जाहिराती, लिमिटेड स्किप्स आणि स्टँडर्ड ऑडिओ क्वालिटी मिळते.
Ans: स्पॉटीफाय फ्री, प्रीमियम इंडिव्हिज्युअल, ड्युओ, फॅमिली आणि प्रीमियम प्लॅटिनम (एआय डीजेसह) उपलब्ध आहेत.
Ans: होय, पण फक्त Premium वापरकर्त्यांसाठी डाउनलोड करून ऑफलाइन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध आहे.






