International Thank you Day : 11 जानेवारी: आंतरराष्ट्रीय आभार दिन! फक्त दोन शब्द जे तुमचं आयुष्य बदलू शकतात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
International Thank You Day 11 January 2026 : आपल्या धावपळीच्या आयुष्यात अनेकजण आपल्याला नकळत मदत करत असतात. कधी कुटुंबातील सदस्य, कधी मित्र, तर कधी एखादा अनोळखी व्यक्ती. पण आपण त्यांना ‘थँक यू’ (Thank you) म्हणायला अनेकदा विसरतो किंवा ते गृहीत धरतो. आज ११ जानेवारी, हाच विसरलेला ‘आभार’ मानण्याचा खास दिवस आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच हा दिवस साजरा करण्यामागे एकच उद्देश आहे, तो म्हणजे येणाऱ्या पूर्ण वर्षासाठी कृतज्ञतेची सवय लावणे.
तुम्हाला माहीत आहे का? ‘थँक यू’ (Thank You) हा शब्द अचानक आलेला नाही. ४५० ते ११०० च्या दरम्यान जुन्या इंग्रजी भाषेतील ‘Pancian’ या शब्दावरून याची निर्मिती झाली, ज्याचा मूळ अर्थ ‘विचार’ (Thought) असा होता. मध्ययुगात याचा अर्थ बदलून “कोणी केलेल्या मदतीबद्दल मनात असलेली प्रेमळ भावना” असा झाला. १६ व्या आणि १७ व्या शतकातील व्यावसायिक क्रांतीदरम्यान दुकानांमध्ये आणि कार्यालयांमध्ये ‘थँक यू’ म्हणण्याची प्रथा सामान्य झाली आणि तिथून हा शब्द जगभर पोहोचला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट
कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत हजारो वर्षांपूर्वीची आहे. प्राचीन इजिप्शियन लोक ‘पपिरस’वर संदेश लिहून एकमेकांना पाठवत असत, तर चिनी संस्कृतीत कागदावर शुभेच्छा संदेश लिहिण्याची परंपरा होती. १४०० च्या सुमारास युरोपमध्ये हस्तलिखित ‘थँक यू’ नोट्स लोकप्रिय झाल्या. १८७३ मध्ये लुई प्रांग या जर्मन व्यक्तीने अमेरिकेत व्यापारी स्तरावर ग्रीटिंग कार्ड्सची निर्मिती सुरू केली, ज्यामुळे आभार मानण्याची ही पद्धत घरोघरी पोहोचली.
Today is International ‘Thank You’ Day 🙏🏽 pic.twitter.com/3NVAK7LYds — Superteam Nigeria (@SuperteamNG) January 11, 2025
credit : social media and Twitter
केवळ औपचारिकता म्हणून नाही, तर विज्ञानाच्या दृष्टीनेही आभार मानणे खूप महत्त्वाचे आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, जे लोक नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांच्यात नैराश्य (Depression) आणि चिंता (Anxiety) कमी आढळते. जेव्हा आपण कोणाचे आभार मानतो, तेव्हा आपल्या मेंदूत ‘डोपामाइन’ आणि ‘सेरोटोनिन’ ही आनंदाची संप्रेरके तयार होतात, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर
Ans: हा दिवस दरवर्षी ११ जानेवारी रोजी साजरा केला जातो.
Ans: या दिवसाची नेमकी सुरुवात कोणी केली हे अज्ञात असले, तरी १९०० च्या सुरुवातीला ग्रीटिंग कार्ड कंपन्यांनी याला प्रोत्साहन दिल्याचे मानले जाते.
Ans: यामुळे मानसिक ताण कमी होतो, झोप चांगली लागते, नातेसंबंध सुधारतात आणि व्यक्तीमध्ये सकारात्मकता वाढते.






