मेल किंवा मॅसेजमध्ये हे दोन शब्द दिसले तर सावधान! स्कॅमर्स करू शकतात तुमचं मोठे नुकसान, FBI ने जारी केली वॉर्निंग
स्कॅमर्स लोकांची फसवूणक करण्यासाठी आणि त्यांचे बँक अकाऊंट रिकामं करण्यासाठी अनेक नवीन पद्धतींचा वापर करत आहेत. गेल्या काही महिन्यांत स्कॅमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फ्रॉड मॅसेज, बनावट लिंक, बनावट सेल ऑफर्स, फेक वेबसाईट अशा पद्धतींचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते. जर तुम्ही स्कॅमर्सनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक केलं तर क्षणार्धात तुमचं बँक अकाऊंट रिकामं होतं. याशिवाय अशा देखील अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये स्कॅमर्स आपल्या फोनमध्ये व्हायरस इंस्टॉल करतात. ज्यामुळे आपली सर्व माहिती स्कॅमर्सकडे जाते आणि ते सहज आपली फसवणूक करू शकतात.
अखेर DeepSeek वर बंदी, यूएस नेव्हीचा मोठा निर्णय! AI मॉडेलबाबत जारी केले हे कठोर नियम
आपण एकदा स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकलो तर त्यातून बाहेर पडणं कठीण आहे. सायबर कंपन्या आणि सरकार नेहमी लोकांना जागृत राहण्यासाठी आणि स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी वॉर्निंग जारी करत असते. ज्यामुळे लोकांची सुरक्षा कायम राहते. आता देखील अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने वॉर्निंग जारी केली आहे. अमेरिकन एजन्सी एफबीआयने स्कॅमर्सपासून वाचण्याचा इशारा देत म्हटलं आहे की, जर हे दोन शब्द तुम्हाला मिळालेल्या ईमेल किंवा मॅसेजमध्ये असतील तर सावध व्हा. कारण यामुळे तुम्हाला समजेल की हा मॅसेज किंवा ईमेल तुम्हाला स्कॅमर्सनी पाठवलेला असू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ही जगातील एक प्रसिद्ध संस्था आहे. सायबर गुन्हेगारांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी एक वॉर्निंग जारी केली आहे. एफबीआयने सांगितलं आहे की, तुम्हाला आलेल्या कोणत्याही ईमेलमध्ये किंवा मेसेजमध्ये ‘Act Fast’ असे लिहिलेले असेल, तर तुम्ही सावध व्हावे. स्कॅमर सामान्यतः या दोन शब्दांचा वापर करतात. याद्वारे स्कॅमर वापरकर्त्यांना दाखवू इच्छितात की त्यांनी कोणत्याही लिंकवर क्लिक न केल्यास, कोणतेही अटॅचमेंट ओपन केले नाही किंवा कोणतीही माहिती शेअर केली नाही तर त्यांना काही ऑफर किंवा सेल गमवावे लागू शकते.
स्कॅमर लोकांवर दबाव आणण्यासाठी हे शब्द वापरतात. तुम्हाला आलेल्या ईमेल किंवा मॅसेजमध्ये या शब्दांचा वापर केला असल्यास सावध व्हा. कारण या ईमेल किंवा मॅसेजमध्ये असलेल्या कोणत्याही लिंकवर तुम्ही क्लिक केले किवा कोणतेही अटॅचमेंट ओपन केले किंवा कोणतीही माहिती शेअर केली तर तुम्ही स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकू शकता. आणि क्षणार्धात तुमचं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं.
Alibaba ने लाँच केलं नवीन AI मॉडेल, DeepSeek V3 पेक्षा किती प्रगत? कंपनीचा परफॉर्मेंसबाबत मोठा दावा