वर्षाच्या शेवटी Jio चा युजर्सना पुन्हा झटका; या दोन लोकप्रिय प्लॅन्सची व्हॅलिडीटी केली कमी
जुलै महिन्यात देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली. त्यानंतर मोठ्या संख्येने मोबाईल युजर्स सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलकडे वळले. यानंतर भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन रिचार्ज प्लॅन सुरु केले. ज्यामध्ये युजर्सना कमी किंमतीत अनेक फायदे मिळू शकतील.
या देशात नाही होणार iPhone 14 सह 3 मॉडेल्सची विक्री, कंपनीने का घेतला निर्णय? जाणून घ्या कारण
यानंतर अनेक युजर्स पुन्हा एकदा जिओकडे वळल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. यानंतर आता जिओने त्यांच्या युजर्सना एक नवीन झटका दिला आहे. कंपनीने त्यांच्या दोन पॉप्युलर रिचार्ज प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये कपात केली आहे. यामुळे जिओ युजर्सना धक्का बसला असून युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने त्यांच्या सर्वात परवडणाऱ्या 19 रुपये आणि 29 रुपयांच्या डेटा व्हाउचरच्या व्हॅलडिटीमध्ये मोठे बदल केले असल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीने या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली आहे. जिओचे 19 रुपये आणि 29 रुपयांचे डेटा प्लॅन खूप पॉप्युलर आहेत.
19 रुपये आणि 29 रुपयांचे डेटा प्लॅन व्हॅलिडीटीमध्ये मोठे बदल केले आहेत. हे असे डेटा व्हाउचर आहेत ज्यावर बहुतेक रिलायन्स जिओ ग्राहक त्यांच्या अल्पकालीन डेटा गरजांसाठी अवलंबून असतात. काही महिन्यांपूर्वी 19 रुपयांच्या व्हाउचरची किंमत 15 रुपये होती, तर 29 रुपयांच्या व्हाउचरची किंमत 25 रुपये होती. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दरवाढीमुळे या व्हाउचरच्या किंमती वाढवण्याच आल्या आहेत. रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर आता या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.
TelecomTalk च्या अहवालानुसार, रिलायन्स जिओने 19 आणि 29 रुपयांच्या डेटा व्हाउचरची व्हॅलिडीटी बदलली आहे. यापूर्वी, 19 रुपयांच्या व्हाउचरची व्हॅलिडीटी केवळ वापरकर्त्याच्या बेस ॲक्टिव्ह प्लॅनची होती. उदाहरणार्थ, जर वापरकर्त्याच्या बेस प्लॅनची व्हॅलिडीटी 70 दिवस शिल्लक असेल, तर हे 19 रुपयांचे डेटा व्हाउचर 70 दिवसांसाठी किंवा डेटा पूर्णपणे वापरेपर्यंत व्हॅलिड असेल. पण, आता या प्लॅनची व्हॅलिडीटी 1 दिवसाची करण्यात आली आहे. म्हणजेच 19 रुपयांच्या डेटा व्हाउचरची नवीन व्हॅलिडीटी 1 दिवसाची आहे.
Lava Yuva 2 5G भारतात लाँच, 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार हे जबदरस्त फीचर्स
29 रुपयांच्या डेटा व्हाउचरवरही असेच केले गेले आहे. त्याची व्हॅलिडीटी देखील वापरकर्त्याच्या ॲक्टिव्ह सक्रिय योजनेसारखीच होती. आता रिलायन्स जिओच्या 29 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये ग्राहकांना 2 दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल.
जिओने या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये अलीकडे अनेक बदल केले आहेत. कमी झालेल्या व्हॅलिडीटीचा अर्थ असा आहे की जेव्हा युजर्सना अधिक डेटाची आवश्यकता असेल तेव्हा त्यांना पुन्हा रिचार्ज करावे लागेल, जरी त्यांनी व्हाउचरमधील संपूर्ण डेटा पहिल्यांदा वापरला नसला तरीही त्यांना पुन्हा रिचार्ज करण्याची गरज असणार आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.