Year Ender 2024: यावर्षी टेक क्षेत्रात घडले महत्त्वाचे बदल; AI पासुन आउटेजपर्यंत एका क्लिकवर सर्व जाणून घ्या
येत्या 2 दिवसांत 2024 चं वर्ष संपणार आहे. यावर्षी असे अनेक शोध लावण्यात आले, जे कल्पनेच्या पलीकडचे आहेत. खरं तर टेक क्षेत्रातील दिग्गजांनी 2024 मध्ये यशाचं एक नवीन शिखर गाठलं आहे. या वर्षी कल्पनेपलीकडचे अनेक नवनवीन प्रयोग झाले. मग ती स्टीयरिंग-लेस टॅक्सी असो किंवा चीनमध्ये बांधलेले एआय हॉस्पिटल. इतिहासातील सर्वात मोठा आऊटेज देखील यंदा पाहायला मिळाला. जर आपण 2024 मधील सर्वात मोठ्या नवकल्पनाबद्दल बोललो तर त्यात न्यूरालिंकचा देखील उल्लेख केला जाईल.
Elon Musk चा हा प्रयोग सर्वांच्या कल्पनेपलीकडचा होता. या वर्षी एका व्यक्तीच्या मेंदूमध्ये एक चिप बसवण्यात आली, जी चमत्कारापेक्षा कमी नाही. 2 दिवसातच नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यापूर्वी 2024 मधील टेक क्षेत्रातील काही नवीन शोध आणि प्रयोगांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ होती. या वर्षाच्या सुरुवातीला इलॉन मस्कच्या टेक स्टार्टअप न्यूरालिंकने ही कामगिरी केली होती. कंपनीने या चिपबाबत दावा केला आहे की, याच्या माध्यमातून कम्युनिकेशन आणि बॉडी कंट्रोल केले जाऊ शकते. याचे प्रयोग देखील सुरू करण्यात आले.
एजंट हॉस्पिटल – ज्यामध्ये रूग्णांवर रोबोटद्वारे उपचार केले जातात. जगातील पहिले AI हॉस्पिटल बनवणारा देश चीन आहे. या हॉस्पिटलमध्ये 14 AI डॉक्टर आणि 4 AI परिचारिका आहेत. 2024 मध्ये बांधण्यात आलेले AI हॉस्पिटल नवीन नवकल्पनांच्या दृष्टिकोनातून खूपच मनोरंजक आहे. या हॉस्पिटलमध्ये असलेले एआय डॉक्टर मशीन लर्निंगच्या आधारे काम करतात.
ॲपलच्या व्हिजन प्रो हेडसेटची रचना AR आणि VR तंत्रज्ञानाने करण्यात आली आहे. हा कंपनीचा मिक्स्ड रिॲलिटी हेडसेट आहे. वापरकर्त्याला या हेडसेटमध्ये दोन मोडची सुविधा मिळते. VR मोडमध्ये वापरकर्त्याच्या डोळ्यांसमोर एक वर्तुळ पण वास्तववादी जग असते. ॲपलचा हा नवोपक्रम अनेक अर्थांनी खास आहे. त्याला 2024 मध्ये ‘इनोव्हेशन ऑफ द इयर’ पुरस्कारही मिळाला आहे.
Vivo चा नवीन 5G फोन लाँच, मोठी बॅटरी आणि स्लिम डिझाईनने सुसज्ज! किंमत केवळ इतकी
जेव्हा जगातील सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोनचा विचार केला जातो, तेव्हा Honor Magic V3 चे नाव लक्षात येईल. AI वैशिष्ट्यांसह सुसज्ज हे डेव्हिस केवळ 9.2 मिमी जाडीचे आहे. हे इतर वैशिष्ट्यांसह समोरासमोर भाषांतर, एआय इरेजर आणि नोट्स, एआय-सक्षम फोटोग्राफी वैशिष्ट्ये देखील देते.
एआयनेही शैक्षणिक क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणण्याचे काम केले. आयरिस यांना भारतातील पहिले AI शिक्षक म्हणून ओळखले जाते. या वर्षी मार्चमध्ये तिरुअनंतपुरमच्या KTCT स्कूलने विकसित केले होते.
साहजिकच 2024 हे एआय आणि इनोव्हेशनच्या नावावर होते. पण एक वेळ अशी आली की जग थांबले. विमानतळापासून बँकिंग क्षेत्राला त्याचा फटका बसला. आम्ही जुलैमध्ये झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या शटडाउनबद्दल बोलत आहोत. यामुळे, 95 टक्के विंडोज सिस्टम्स अचानक काम करणे बंद झाले. या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विंडोज वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.