Vivo चा नवीन 5G फोन लाँच, मोठी बॅटरी आणि स्लिम डिझाईनने सुसज्ज! किंमत केवळ इतकी
स्मार्टफोन कंपनी Vivo ने नुकताच एक नवीन स्मार्टफोन चिनी बाजारात लाँच केला आहे. Vivo Y200+ या नावाने हा नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. मोठी बॅटरी आणि स्लिम डिझाईन अशा युनिक कॉम्बिनेशनमुळे सध्या या फोनची सर्वत्र चर्चा सुरु आहे. कंपनीने नवीन Vivo Y200+ स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला तर मग स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – Vivo)
वर्षाच्या शेवटी Jio चा युजर्सना पुन्हा झटका; या दोन लोकप्रिय प्लॅन्सची व्हॅलिडीटी केली कमी
Vivo Y200+ स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB यांचा समावेश आहे. Vivo Y200+ स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंट 1,099 युआन म्हणजेच अंदाजे 12,809 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 1,299 युआन म्हणजेच अंदाजे 15,200 रुपये आहे. तसेच स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत1,499 युआन म्हणजेच अंदाजे 17,505 रुपये ठेवण्यात आली आहे.
Vivo Y200+ स्मार्टफोन ऍप्रिकॉट सी, स्काय सिटी आणि मिडनाईट ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. Vivo Y200+ चीनच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन JD.com सारख्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता.
डिस्प्ले – Vivo Y200+ मध्ये 6.68-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिझोल्यूशन 720×1608 पिक्सेल आहे आणि स्मूथ व्हिज्युअलसाठी 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 1000 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात ब्लू लाइटसाठी TUV राईनलँड सर्टिफिकेशन आणि फ्लिकर कमी करण्यासाठी ग्लोबल डीसी डिमिंग आहे.
प्रोसेसर – परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 जनरल 2 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. हे 12GB पर्यंत RAM आणि 512GB स्टोरेजसह जोडलेले आहे. गरजेनुसार, स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. स्मार्टफोन Funtouch OS वर चालतो.
कॅमेरा सेटअप – Vivo चा नवीन फोन ड्युअल कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात 50MP अल्ट्रा-क्लीअर प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. नाईट मोडच्या मदतीने हा कॅमेरा कमी प्रकाशातही शार्प पिक्चर्स क्लिक करू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP सेंसर देण्यात आला आहे.
Apple AirPods: गाणी ऐकण्यासोबतच आता हेल्थ अपडेटही मिळणार, Apple चं नवीन गॅझेट बरंच फायद्याचं ठरणार
बॅटरी आणि चार्जिंग – बॅटरी आणि चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोन 6000 mAh च्या मोठ्या बॅटरीसह येतो. यात 44W फास्ट चार्जिंगची सुविधाही आहे. हे एका चार्जवर एक दिवस आरामात चालू शकते. कंपनीने दावा केला आहे की ते केवळ 36 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते.
डिझाइन आणि टिकाऊपणा – मोठी बॅटरी असूनही, vivo Y200+ फक्त 7.99mm जाडीसह स्लिम आणि अर्गोनॉमिक डिझाइनसह उपलब्ध आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षिततेसाठी याला IP64 रेटिंग मिळाले आहे. टिकाऊपणासाठी रॉक सॉलिड शॉक एब्जॉर्प्शन ड्यूरेबिलिटी आहे. डिव्हाइसमध्ये 5G आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर देखील आहेत जे 300% पर्यंत अल्ट्रा-हाय व्हॉल्यूम वितरीत करण्यास सक्षम आहेत.